ETV Bharat / state

मुंबईकरांचा पुन्हा संताप; नराधमाकडून दोन चिमुकल्या मुलींचा विनयभंग, विवस्त्र होत अत्याचाराचा प्रयत्न - Girl Abused In Mumbai - GIRL ABUSED IN MUMBAI

Girl Abused In Mumbai : शेजारी राहणाऱ्या एका 26 वर्षीय नराधमानं दोन चिमुकल्यांचा विनयभंग केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना मुंबईतील खार परिसरातील एका कॉलनीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

Girl Abused In Mumbai
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 11:35 AM IST

मुंबई Girl Abused In Mumbai : शेजारी राहणाऱ्या एका 26 वर्षीय नराधमानं 6 आणि 12 वर्षीय चिमुकल्यांचा विनयभंग केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना खार इथल्या खार दांडा परिसरात उघडकीस आली असून या घटनेतील नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत, अशी माहिती खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन माने यांनी दिली. नराधमानं चिमुकल्या मुलींचा विनयभंग केल्यानं खार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नराधमाकडून दोन चिमुकल्यांचा विनयभंग : शेजारी राहणाऱ्या नराधमानं सहा वर्ष आणि 12 वर्षाच्या चिमुकल्यांचा विनयभंग केल्यानं मोठी खळबळ उडाली. या नराधमानं मंगळवारी एका सहा वर्षाच्या चिमुकलीला कानाला धरुन वर उचललं, तर दुसऱ्या चिमुकलीचा हात पकडून तिला मारण्याची भीती दाखवून तो विवस्त्र होण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे घाबरलेल्या चिमुकल्या मुलींनी हा प्रकार त्यांच्या पालकांना सांगितला. त्यामुळे पालकांनी तत्काळ खार पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या नराधमावर गुन्हा दाखल करुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे खार परिसरात मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नराधमाला कुटुंबीयांनी पाठवलं होतं पुनर्वसन केंद्रात : खार परिसरात मंगळवारी चिमुकल्यांचा विनयभंग केल्यानं नागरिकांचा मोठा संताप झाला आहे. पोलिसांनी या 26 वर्षाच्या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. या नराधमाला त्याच्या कुटुंबीयांनी पुनर्वसन केंद्रात पाठवलं होतं. त्यानंतर तो नुकताच पुनर्वसन केंद्रातून घरी परतला होता. हा नराधम मागील आठवड्यापासून या चिमुकल्यांना त्रास देत होता. मंगळवारी त्यानं दोन्ही चिमुकल्यांचा विनयभंग केल्यानं परिसरातील नागरिक संतापले आहेत.

कानातले विकणाऱ्या नराधमाकडून चिमुकलीचा विनयभंग : नागपाडा इथल्या झुबेर शहा या कानातले विक्रेत्यानं एका चिमुकलीचा विनयभंग केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी कानातले विकणाऱ्या झुबेर शहा याला पोलिसांनी अटक केली. त्यानं 8 वर्षांच्या मुलीला कानातले दाखवण्याच्या बहाण्यानं अयोग्यरित्या स्पर्श केला. त्यावेळी तेथून जाणाऱ्या एका महिलेनं हा प्रकार पाहून आरडाओरडा करुन नागरिकांना गोळा केलं. त्यानंतर नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.

हेही वाचा :

  1. सोशल माध्यमांवर झाली ओळख : नराधमानं गुजरातमध्ये नेऊन 13 वर्षीय बालिकेवर केला बलात्कार - Social Media Friend Raped Girl
  2. शेजारधर्माला काळिमा : 9 वर्षीय चिमुकलीला सार्वजनिक शौचालयात नेऊन दाखवला अश्लील व्हिडिओ, 35 वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार - Man Abused 9 Year Girl

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.