मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्स बिश्नोई गँगनं हत्या घडवून आणल्याचा दावा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 14 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यात आता पुन्हा एका आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी पंजाबमधून एका आरोपीला अटक केली आहे. सुजीत कुमार असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. मुंबई पोलिसांनी त्याला पंजाबमधील लुधियानामधील सुंदर नगरमधून अटक केली असून त्याला मुंबईत आणलं जात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं वृत्तसंस्थेला दिली आहे. तर दुसरीकडं मुंबई पोलिसांनी राम फुलचंद कनौजिया या आरोपींच्या घरातून शस्त्र जप्त केली आहेत.
Baba Siddiqui Murder Case: Mumbai police recovers weapon from accused's house
— ANI Digital (@ani_digital) October 25, 2024
Read @ANI Story | https://t.co/pVw8CIsW70#BabaSiddique #MumbaiPolice #BabaSiddiquiMurder #NCP pic.twitter.com/zwQciYFSzs
मुंबई पोलिसांनी लुधियानातून आरोपीला केलं अटक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात आणखी सुजीत कुमार या आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. सुजीत कुमार या आरोपीला मुंबई पोलिसांनी लुधियानातील सुंदरनगर इथून अटक केली आहे. त्याला पंजाब पोलिसांच्या मदतीनं बेड्या ठोकण्यात आल्या. त्यानंतर त्याल जमालपूर इथल्या पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. मुंबई पोलीस सुजीत कुमारला घेऊन मुंबईकडं निघाले आहेत. सुजीत कुमारला अटक केल्यानंतर बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
#WATCH | Baba Siddique murder case: Mumbai Police has arrested another accused Sujeet Kumar, from Punjab's Ludhiana. He is being taken to Mumbai by the police.
— ANI (@ANI) October 25, 2024
(Source: Crime Investigation Agency of Punjab Police, Ludhiana) pic.twitter.com/XIcWoJGk5p
आरोपीच्या घरातून आणखी शस्त्र जप्त : मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात राम फुलचंद कनौजिया याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या रायगड इथल्या घरातून शस्त्र जप्त केले आहेत, अशी माहिती शुक्रवारी दिली आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या करताना मारेकऱ्यांनी पाच शस्त्राचा वापर केल्याचं मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात उघड झालं आहे. त्यातील चार शस्त्र पोलिसांनी जप्त केली आहेत. सध्या पोलीस ऑस्ट्रेलियन बनावटीच्या ब्रेटा या पिस्तुलाचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मारेकऱ्यांच्या फोनमध्ये आढळले पिस्तुलाचे फोटो : मुंबई पोलिसांनी मारेकऱ्यांच्या फोनची झाडाझडती घेतली असता, त्यामध्ये पिस्तुलांचे फोटो आढळून आले. पिस्तुलांचे फोटो आढळून आल्यानंतर मुंबई पोलिसांनी या शस्त्रांचा शोध सुरू केला. पोलिसांनी लुधियाना इथून सुजीत कुमार याला बेड्या ठोकल्यानंतर या प्रकरणाला आता चांगलीच गती मिळाली आहे.
हेही वाचा :