ETV Bharat / state

अचानक पडलेल्या पावसामुळं मुंबईकरांची तारांबळ, मान्सून पूर्व पावसाचा हवामान खात्याचा दावा - Mumbai Monsoon Update - MUMBAI MONSOON UPDATE

Mumbai Monsoon Update : मुंबईत सकाळी अचानक पावसाला सुरुवात झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेक भागत हलक्या ते जोरदार सरी कोसळल्या. हा मान्सून पूर्व पाऊस असल्याचा दावा हवामान खात्यानं केला आहे.

Mumbai Monsoon Update
पावसामुळं मुंबईकरांची तारांबळ (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 10:48 AM IST

मुंबई - Mumbai Monsoon Update : लोकसभा निकडणुकीची मतमोजणी मंगळवारी पार पडली. मुंबईकर उकड्यानं पहिलेच हैराण झाले असतांना लोकसभा मतमोजणीमुळे मुंबईत राजकीय वातावरण देखील तापलं होतं. मुंबईसह उपनगरात अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. हलक्या सरी तर चांगला पाऊस बरसल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांची सकाळ काहीशी दिलासादायक झाली आहे.

पावसामुळं मुंबईकरांची तारांबळ (Etv Bharat)
आज सकाळी मुंबईत पावसानं हजेरी लावली. काही भागात हलक्या सरी तर काही भागात जोरदार पाऊस पडला. दादर परिसरात देखील पावसानं हजेरी लावली. पश्चिम उपनगरातील कांदिवली, अंधेरी आणि वांद्रे परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. घाटकोपर, वडाळा यांसह मुंबईतील काही भागात तुरळक पाऊस पडल्याची नोंद आहे. अचानक पडलेल्या पावसामुळं मुंबईकरांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली. पूर्व मोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार होतंय. ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं कमाल तापमानामध्ये देखील घट होत असल्याचे चित्र आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच उडालेली दिसून येतेय. हा पाऊस पूर्व मान्सूनचा असल्याचा दावा हवामान खात्याचा केला आहे.

येत्या पाच दिवसात पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या पाच दिवसात कोकणात रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीजांचा कडकडाट सह वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठाणे जिल्ह्यात 5 ते 8 जून तर मुंबई शहर आणि उपनगरात 6 ते 8 जूनला वीजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यात सात जून रोजी वीजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर राहण्याचा अंदाज देखील हवमान खात्यानं वर्तवंला आहे.

हेही वाचा -

केरळात मान्सून दाखल, मुंबई आणि महाराष्ट्रात कधी? वाचा काय म्हणाले हवामान तज्ञ - Monsoon Update

केरळमध्ये दोन दिवसांपूर्वी मान्सूनचे आगमन, अनेक शहरांमध्ये जोरदार पाऊस - Monsoon arrived in Kerala

सत्तास्थापन करण्याकरिता इंडिया आघाडी आज ठरविणार रणनीती, शरद पवारांसह सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना - INDIA Bloc meeting today

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.