ETV Bharat / state

बनावट कागदपत्रांसह मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशींना एटीएसकडून अटक; लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचं उघड - Mumbai ATS arrested Bangladeshi - MUMBAI ATS ARRESTED BANGLADESHI

Mumbai ATS arrested Bangladeshi : मुंबई एटीएसने बनावट कागदपत्रांसह मुंबईत राहणाऱ्या ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. एटीएसने आणखी ५ बांगलादेशींची ओळख पटवली असून त्यांचा शोध सुरू आहे.

Etv Bharat
फाईल फोटो (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 3:48 PM IST

Updated : Jun 11, 2024, 5:25 PM IST

मुंबई Mumbai ATS arrested Bangladeshi : एटीएसनं मुंबईत मोठी कारवाई करत ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसंच बांगलादेशी नागरिकांबाबत अजून एक धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. या सर्वांनी बनावट नागरिकत्वाच्या कागदपत्रांच्या आधारे मतदार ओळखपत्रेही मिळवली होती. तसंच आरोपींनी लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचे एटीएसने उघड केलं आहे.

इतर बांगलादेशींचा शोध सुरू : बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिक मुंबईत जास्त प्रमाणात राहत असल्याचं मागील काही महिन्यांपासून दिसून येत आहे. अशा नागरिकांवर मुंबई पोलीस आणि संबंधित यंत्रणा कारवाई करत आहेत. मंगळवारी मुंबई एटीएसनं बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबईत राहणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. तसंच इतर पाच बांगलादेशी नागरिक फरार झाले आहेत. त्यांचा शोध घेत असल्याची माहिती मुंबई एटीएसनं दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत केलं मतदान : भारतीय नागरिकांनाच देशातील निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे. मात्र, बनावट कागदपत्रांच्या आधारे बांगलादेशी नागरिकांनी बनावट मतदान कार्ड तयार केले आणि लोकसभा निवडणुकीत मतदान केल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळं अशा किती बांगलादेशी नागरिकांनी बनावट मतदान कार्ड तयार करुन लोकसभा निवडणुकीत मतदान केलं याचा तपास सध्या मुंबई एटीएस करत आहे.

आरोपींची नावे : दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटनं केलेल्या कारवाई प्रकारणी कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ सहकलम १२ (१६) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. रियाज हुसेन शेख (वय ३३), सुलतान सिद्दीकी शेख (वय ५७), इब्राहिम शफिउल्ला शेख (वय ४६) आणि फारूक उस्मानगणी शेख (वय ३९) अशी अटक बांगलादेशी आरोपींची नावे आहेत.

सूरतमध्ये राहत असल्याचे दिले पुरावे : रियाज हुसेन शेख हा इलेक्ट्रिशन असून, अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात राहतो. तर सुलतान शेख हा रिक्षाचालक असून, मालाड येथील मालवणीत राहतो. त्याचप्रमाणे इब्राहिम शफिउल्ला शेख याचा भाजी विक्रीचा व्यवसाय असून, तो माहुल गावात राहतो. फारुख शेख हा जोगेश्वरी पश्चिम येथील ओशिवरा या परिसरात राहतो. हे चारही आरोपी मूळचे बांगलादेशातील नोवाखाली जिल्ह्यातील कबीर हाट या गावातील आहेत. या बांगलादेशींवर बेकायदेशीररित्या भारतात वास्तव्य करत असल्याबाबत मुंबईत गुन्हे दाखल आहेत. ते गुजरात राज्यातील सुरत येथे राहण्यास असल्याचे पुरावे प्राप्त केले. त्याआधारे त्यांनी पासपोर्ट प्राप्त केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आले. त्याचप्रमाणे ५ वॉन्टेड आरोपींनी देखील पासपोर्ट बनवल्याचं दिसुन आलं. त्यातील एक आरोपी पासपोर्टच्या आधारे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले.

हेही वाचा -

  1. पत्नी पत्नीच्या भांडणात पाच महिन्याच्या चिमुकलीचा बळी; निर्दयी बापानं पोटच्या मुलीला आपटलं जमिनीवर
  2. पिंपरी-चिंचवडमधील बांगलादेशी घुसखोरांच्या आवळल्या मुसक्या; पाच जणांना अटक
  3. मुंबईतून बांग्लादेशात पाठवायचे पैसे, 5 बांगलादेशी नागरिकांना अटक

Last Updated : Jun 11, 2024, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.