मुंबई Ladki Bahin Yojana : सध्या राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा बोलबाला आहे. या योजनेसाठी एक कोटींहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तसंच योजनेचे दोन हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे.
1500 रुपये मिळण्यास झाली सुरुवात : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'तील महिलांना तिसऱ्या हफ्त्याचे 1500 रुपये मिळण्यास सुरुवात झालीय. रविवारी 29 सप्टेंबर रोजी राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांपैकी 34 लाख 74 हजार 116 लाभार्थ्यांच्या खात्यात 521 कोटी रुपये जमा झाल्याची माहिती, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
तिन्ही हफ्ते झाले जमा : या योजनेतील उर्वरीत सर्व पात्र भगिनींना महिना अखेरपर्यंत लाभ मिळणार असून, ज्या भगिंनीना जुलै महिन्यात दोन हफ्त्यांचे मिळून 3 हजार रुपये मिळाले होते, त्यांच्या खात्यात 1500 रुपयांचा तिसरा हफ्ता देण्यात आला. तर, ज्यांना काही अडचणींमुळं यापूर्वी लाभ मिळाला नव्हता, त्यांच्या खात्यात एकाच वेळेस तिन्ही हफ्ते मिळून 4500 रुपये जमा करण्यात आल्याची माहिती, आदिती तटकरे यांनी दिली.
या आहेत तांत्रिक अडचणी : ज्या महिलांनी या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केले आहेत, मात्र त्यांचा अर्ज काही तांत्रिक अडचणींमळं अद्याप पात्र ठरला नाही. त्यांनी त्यांच्या अर्जामधील त्रुटी दूर केल्यानंतर त्यांना देखील या योजनेचे पैसे दिले जाणार आहेत. काही महिलांचे अर्ज योग्य असले तरी त्यांचे बॅंक खाते आधार कार्डासोबत जोडलेले नसल्यानं त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नव्हता. त्यामुळं त्या महिलांनी त्यांचे बॅंक खाते त्यांच्या आधार कार्डासोबत जोडल्यावर त्यांना या योजनेचे पैसे मिळतील.
हेही वाचा -