ETV Bharat / state

मुकेश अंबानींनी वर्षावर जाऊन दिलं मुख्यमंत्र्यांना आमंत्रण, कसा असणार शाही विवाह सोहळा? - Anant Ambani and Radhika wedding

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 26, 2024, 10:15 AM IST

Updated : Jun 26, 2024, 10:55 AM IST

Anant Ambani and Radhika Merchant Marriage : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या शाही विवाह सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. वरपिता मुकेश अंबानींनी वर्षावर जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लग्नाचं आमंत्रण दिलं आहे. मुंबईत पार पडणारा हा विवाह कसा असेल हे जाणून घेण्यासाठी वाचा.

Mukesh Ambani met Chief Minister Eknath Shinde
मुकेश अंबानींनी वर्षावर जाऊन दिलं मुख्यमंत्र्यांना आमंत्रण (Etv Bharat)

मुंबई - Anant Ambani and Radhika Merchant Marriage : देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 12 जुलै रोजी विवाह पार पडणार आहे. या शाही विवाह सोहळ्यासाठी अंबानी कुटुंबाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना लग्नाचं निमंत्रण देण्यात येत आहे. दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या लग्नासाठी आमंत्रण दिलं. मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' निवासस्थानी जाऊन उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं.

शाही विवाह सोहळा कुठे?अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 12 जुलै रोजी मुंबईत विवाह सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा शाही लग्न सोहळा होईल. या कार्यक्रमाला कला, क्रीडा, मनोरंजन, संगीत, राजकीय, सांस्कृतिक आदी क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण देण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी अनंत अंबानी यांनी मुंबईत अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांच्या 'शिवशक्ती' या निवासस्थानी पोहचत लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. तर सोमवारी अनंत अंबानी यांची आई नीता अंबानी यांनी प्रसिद्ध 'काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन लग्नाचे पहिलं निमंत्रण दिलं होतं. यावेळी नीता अंबानी यांच्या व्हीडिओ व्हायरल झाला होता.

विवाह सोहळ कसा असणार...?मार्च महिन्यात अंबानी कुटुंबाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे जामनगर येथे तीन दिवस प्री-वेडिंग सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज तसेच बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटींनी भाग घेतला होता. या प्री-वेडिंग सोहळ्याची दखल देशभरातील माध्यमांनी घेतली होती. याची चर्चा मोठी झाली होती. यानंतर आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 12 जुलै रोजी मुंबईत विवाह सोहळा होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या विवाह सोहळ्यात अनेक विधीवत कार्यक्रम होणार आहेत. 12 जुलै रोजी पहिल्या दिवशी होणाऱ्या विवाह सोहळ्याासाठी भारतीय पारंपारिक ड्रेस कोड असेल. 13 जुलै रोजी वधू-वरांस शुभ आशीर्वादाचा दिवस असणार आणि 14 जुलै रोजी म्हणजे तिसऱ्या दिवशी लग्नाचे रिसेप्शन आणि मंगल उत्सव होईल , यासाठीही हजर रोहणाऱ्यांसाठी भारतीय ड्रेसकोड असेल. लग्नाच्या पत्रिकेत लाल, सोनेरी कार्ड आहे, ज्यात 3 दिवसांच्या शाही विवाह सोहळ्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी आज मतदान; जनतेचा कौल कुणाला मिळणार? - Vidhan Parishad Election 2024
  2. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद निलंबित - Ghatkopar hoarding incident case
  3. भाडेकरूला काढण्यासाठी वृद्ध दाम्पत्याचं मुन्नाभाई स्टाईल आंदोलन, पाहा काय आहे प्रकार? - Sambhajinagar Crime News

Last Updated : Jun 26, 2024, 10:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.