ETV Bharat / state

अनंत - राधिका यांच्या विवाह सोहळ्यात साधू-संतांना दिली 'ही' खास भेटवस्तू; पाहा व्हिडिओ - Anant Radhika Wedding Gifts

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 9:04 PM IST

Anant Radhika Wedding Gifts : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांच्या शाही विवाह सोहळाची सर्वत्र चर्चा आहे. या विवाह सोहळ्यात बॉलिवूड, क्रीडा, उद्योग, साधू- संत आणि अन्य क्षेत्रातील सर्व दिग्गज सहभागी झाले होते. तर या विवाह सोहळात चर्चा रंगली ती रिटर्न गिफ्टची. छत्रपती संभाजीनगर येथील घृष्णेश्वर मंदिराचे पुजारी शरद दांडगे (Sharad Dandge) यांना देखील या विवाह सोहळ्याचं निमंत्रण आलं होते. यावेळी त्यांना अंबानी कुटुंबीयांनी खास रिटर्न गिफ्ट दिलं आहे.

Anant Radhika Wedding News
घृष्णेश्वर मंदिराचे पुजारी शरद दांडगे (ETV BHARAT Reporter)

छत्रपती संभाजीनगर Anant Radhika Wedding Gifts : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा 12 जुलै रोजी मुंबईमध्ये पार पडला. या विवाह सोहळ्यात अनेक प्रसिद्ध व्यक्ती आमंत्रित होत्या. यामध्ये देशातील बारा ज्योतिर्लिंग मधील शेवटचे महत्त्वाचे मंदिर असलेल्या, घृष्णेश्वर मंदिराचे पुजारी शरद दांडगे (Sharad Dandge) यांचा देखील समावेश होता. त्यांनी या विवाह सोहळ्यात सहभाग घेत वधूवरांना आशीर्वाद दिला. त्यावेळी त्यांना अंबानी कुटुंबीयांनी चांदीचा प्रसादाचा डब्बा आणि ॲपल फोन रिटर्न गिफ्ट दिले. यावेळी आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याची भावना, शरद दांडगे यांनी "ई टीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

प्रतिक्रिया देताना पुजारी शरद दांडगे (ETV BHARAT Reporter)

शरद दांडगे यांना होते निमंत्रण : शहरातील प्रसिद्ध तबलावादक शरद दांडगे हे वेरूळ येथील बारावी ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिराचे पुजारी आहेत. त्यांना प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या विवाहासाठी विशेष निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. एक महिन्यापूर्वी त्यांना अनंत अंबानी यांच्या कार्यालयातून संपर्क करण्यात आला होता. विवाह सोहळ्यासाठी तुम्ही निमंत्रित आहात असं त्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र, याबाबत कोणालाही न सांगण्याची त्यांना अट घालण्यात आली होती. दांडगे त्यांनी होकार कळवल्यानंतर, त्यांच्यासाठी विमानाचे तिकीट आणि मुंबई येथील आलिशान हॉटेलमध्ये पाच दिवस राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विवाह सोहळ्यात सर्वांसाठी बसण्याची वेगळी व्यवस्था होती. तिथे सिनेअभिनेते, देशातील राजकारणी, साधुसंत अशा सर्व क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी होती. या विवाह सोहळ्यात अभूतपूर्व अनुभव आला असून अतिशय प्रेमाने, भक्ती भावाने आणि मनःपूर्वक स्वागत झाल्याचं शरद दांडगे यांनी सांगितलं.

घृष्णेश्वराचा फोटो दिला भेट : अंबानी यांच्या विवाह सोहळ्यात देशातील सर्वच 12 ज्योतिर्लिंगाच्या पुजारी यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. साधू संतांच्या हस्ते शिवशक्ती पूजन करण्यात आले, त्यात शरद दांडगे यांचा समावेश होता. शरद दांडगे यांनी या विवाह सोहळ्यात मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना घृष्णेश्वर महाराजांचा एक फोटो रुद्राक्षाची माळ, भस्म, कुंकू, प्रसाद त्यांना देण्यात आले. अंबानी कुटुंबीयांनी वाकून आदरपूर्वक ही भेट स्वीकारली.

अंबानी कुटुंबीयांनी दिली खास भेट : शरद दांडगे आणि वेरूळ येथील मंदिराचे पुजारी परेश पाठक हे दोघेही किशोर मंदिराचे प्रतिनिधी म्हणून या सोहळ्यात सहभागी झाले. दोन दिवस वेगवेगळ्या विधींमध्ये त्यांनी मंत्रोपाचार देखील केले. त्यांच्या या सहभागाबद्दल अंबानी कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांना अनोखी अशी भेट वस्तू दिली. विष्णूचा मंत्र कोरलेला, वरच्या बाजूला बालाजीचं गंध असलेली चांदीची डबी देण्यात आली. तर दुसऱ्या एका भेटीमध्ये ॲपल फोन देण्यात आला. हा विवाह सोहळा म्हणजे कलीयुगातील कुबेराचा सोहळा असून आयुष्यभरासाठी एक वेगळी आठवण असलेला होता. या आधी कधी अशा विवाह सोहळ्याला उपस्थित राहता आलं नाही आणि भविष्यातही कदाचित असं होणार नाही. त्यामुळं आयुष्यात सुखाचा आणि आनंद देणारा हा सोहळा असल्याचं मत, शरद दांडगे यांनी व्यक्त केलंय.

हेही वाचा -

  1. अनंत-राधिकाच्या लग्नात आलेल्या वऱ्हाडींची नीता अंबानींनी मागितली माफी; 'हे' आहे कारण - Anant Radhika Wedding
  2. अनंत-राधिका यांचं हनिमून डेस्टिनेशन ठरलं! पण प्लॅन... - Anant Ambani and Radhika Merchant
  3. अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा विवाह लावणाऱ्या पंडितानं घेतली 'इतकी' दक्षिणा - Anant Radhika Wedding

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.