ETV Bharat / state

अजहरी अटक प्रकरणातील दगडफेकीत चार पोलीस जखमी, पाच जणांना अटक - ghatkopar crime

Azhari Case : गुजरातच्या जुनागढ येथील एका कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मौलाना अजहरी यांना पोलिसांनी रविवारी (4 फेब्रुवारी) अटक केली. त्यानंतर आता मुंबई पोलिसांनी घाटकोपर आणि विक्रोळी येथून आणखी पाच जणांना अटक केली आहे.

azhari case police arrested 5 for pelting stones on police in ghatkopar
अजहरी प्रकरण : आणखी पाच जणांना पोलिसांनी केली अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 5, 2024, 10:43 PM IST

मुंबई Azhari Case : गुजरात पोलिसांनी रविवारी (4 फेब्रुवारी) मुंबईत येऊन मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना घाटकोपरमधून ताब्यात घेतलं होतं. गुजरातमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर घाटकोपर पोलीस ठाण्याच्या परिसरात मोठा जमाव जमला होता. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. मौलाना मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक केल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी आज (5 फेब्रुवारी) आणखी पाच जणांना अटक केली आहे.

पाच जणांना अटक : घाटकोपर पश्चिमेतून सलमान सईद, मोहम्मद शब्बीरलाल मोहम्मद आणि अजीम शेख तसेच विक्रोळीतील पार्कसाईट परिसरातून मोहम्मद बिलाल अब्दुल रहमान काझी आणि अब्दुल रहमान अब्दुल्ला काझी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले चार आरोपी 21 ते 32 वयोगटातील आहेत. तर एक आरोपी 60 वर्षांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. पाचही आरोपींना विक्रोळी कोर्टात हजर करण्यात आलं असता त्यांना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली आहे.

पोलिसांवर सौम्य दगडफेक : मौलाना अजहरीला अटक केल्यानंतर पोलिसांनी घाटकोपर येथून आणखी पाच जणांवर अटकेची कारवाई केली आहे. या पाच जणांना अटक करून घेऊन जात असताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तीन आरोपींना घाटकोपरमधून घेऊन जात असताना पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत चार ते पाच पोलीस जखमी झाले आहेत. अटक करायला गेलेल्या आरोपींनीच या पोलिसांवर दगडफेक केल्याचं सांगितलं जातंय.

या घटनेनंतर घाटकोपरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं असून या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसंच जमावावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरात एटीएसने मुफ्ती मौलानाला घाटकोपर पोलीस ठाण्यात आणले. त्यावेळी घाटकोपर पोलीस ठाण्याबाहेर शेकडो लोक जमा झाले होते. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संविधान कलम 353, 332, 333, 341, 336, 337, 338, 141, 143, 145, 147, 149 आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या संबंधित कलमांनुसार या जमावाविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

काय आहे प्रकरण : 31 जानेवारीच्या रात्री गुजरातमधील जुनागढ येथे आयोजित एका कार्यक्रमात इस्लामिक धर्मोपदेशक मुफ्ती सलमान अजहरी यांनी काही आक्षेपार्ह विधानं केली होती. मुफ्तींचे हे वक्तव्यं प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. मौलाना मुफ्ती, कार्यक्रमाचे आयोजक मोहम्मद युसूफ मलिक आणि अझीम हबीब ओडेदरा यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. त्यानंतर गुजरात पोलिसांनी रविवारी उशीरा घाटकोपरमधून मुस्लीम धर्मोपदेशक मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला अटक केली.

हेही वाचा -

  1. द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी मौलाना अजहरीला मुंबईतून अटक; पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केल्यामुळं जमावावर गुन्हा दाखल
  2. मुंबईत सहा ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
  3. दोन ट्रकमधून 80 लाखांचा गुटखा जप्त, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.