ETV Bharat / state

वैयक्तिक अजेंडा राबवून गुंड प्रवृत्ती दाखवू नका, श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांना इशारा - LOK SABHA ELECTION 2024

MP Shrikant Shinde : शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर बोलताना शिंदे यांनी भाजपाचे गणपत गायकवाड यांना गुंड प्रवृत्ती दाखवून वैयक्तिक अजेंडा राबवू नका, असा थेट इशाराच दिला आहे.

MP Shrikant Shinde
श्रीकांत शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 5:59 PM IST

मुंबई MP Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली आहे; मात्र स्थानिक भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांनी शिंदे यांना विरोध दर्शवला आहे.

पर्सनल अजेंडा राबवू नका : या संदर्भात श्रीकांत शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "महायुतीने उमेदवारी जाहीर केली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्या सर्व घटक पक्षांना आणि कार्यकर्त्यांना लागू आहेत. त्यापेक्षा जर कोणी वेगळा विचार करत असेल आणि पर्सनल अजेंडा राबवत असेल तर ते योग्य नाही. महायुती म्हणून सर्व कार्यकर्त्यांना काम करावेच लागेल. जर कोणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी काही बाधा आणण्याचा प्रयत्न केला किंवा पर्सनल काही करण्याचा प्रयत्न केला तर ते योग्य ठरणार नाही. त्याचा विचार पक्ष निश्चित करेल", असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी दिला आहे.

विकासकामांच्या जोरावर मते मागणार : कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांमध्ये आपण हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. अंबरनाथ येथील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले आहेत. अंबरनाथ येथे एक सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय आणि आणखी एक रुग्णालय लवकरच येत आहे. याशिवाय अंबरनाथ येथील शिव मंदिराचे कामही आपण केले आहे. या विकासकामांच्या जोरावर तसंच आगामी प्रस्तावित विकासकामांच्या आधारावर आपण जनतेकडे मतं मागणार आहोत आणि आपला विजय निश्चित होईल अशी खात्री आहे, असं श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

काय म्हणाले विश्वास पाठक : श्रीकांत शिंदे यांच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी गणपत गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही; मात्र भाजपा म्हणून आम्ही एकसंघपणे काम करू आणि महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी ठाम उभे राहू, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश समन्वयक विश्वास पाठक यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. शरद पवार आजचे शिवाजी! आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ; पुरुषोत्तम खेडेकर गरजले - Sharad Pawar
  2. कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ 'डॅडी' कायमचा सुटणार, न्यायालयानं सरकारला दिले 'हे' निर्देश - Arun Gawali
  3. "बारामतीची लढाई ही शरद पवार, अजित पवारांची नाही, तर..."; बारामतीबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? - Devendra Fadnvis

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.