ETV Bharat / state

"पराभव झाल्यानं रडीचा डाव": रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, मुख्यमंत्री म्हणाले.... - MP Ravindra Waikar on EVM Hacking

MP Ravindra Waikar : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याकडं ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल सापडल्याचा आरोप महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचा रडीचा डाव सुरू असल्याची टीका केली.

Ravindra Waikar, Amol Kirtikar
रवींद्र वायकर, अमोल कीर्तिकर (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 16, 2024, 8:38 PM IST

मुंबई MP Ravindra Waikar : लोकसभा निवडणुकीचे निकाल येऊन दोन आठवडे झाले. मात्र, ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर विरुद्ध शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांच्यातील निकालाचा मुद्दा अजूनही चर्चेत आहे. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचा निकाल सध्या वादात सापडला आहे. कारण शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांचा केवळ 48 मतांनी विजय झाला होता. तर, ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला होता. त्यावरून मतमोजणीत गैरप्रकार झाल्याचा अमोल कीर्तिकरांनी केलाय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रवींद्र वायकर यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

दिनेश गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल : रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यानी मतमोजणी केंद्रात मोबाईल नेल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या तक्रारीवरून वनराई पोलिसांनी निवडणूक आयोगाचे कर्मचारी दिनेश गुरव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता या सर्व प्रकरणावर रवींद्र वायकर यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना ठाकरे गटावर हल्लाबोल केला. पराभवामुळं ठाकरे गटानं रडीचा डाव सुरू केल्याचा टोला वायकरांनी लगावला आहे. 'ईव्हीएम कोणीही हॅक करू शकत नाही, ठाकरे गट घाणेरडी खेळी करत आहे, कारण पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचं ते म्हणाले.

काय म्हणाले रवींद्र वायकर? : "मतमोजणी केंद्रात एक हजार पोलीस, 20 उमेदवारांचे प्रतिनिधी तसंच 20 पैकी 20 उमेदवार उपस्थित होते. मग रवींद्र वायकर आत जाऊन काही वेगळं कसं करु शकता? EVM हॅक करणं कसं शक्य आहे?" असा प्रश्न वायकर यांनी उपस्थित केला. "निकाल यांच्या विरोधात गेल्यानं फक्त रुडीचा डाव चालू आहे. त्यामुळं यामागं त्यांची काही खेळी असू शकते. निवडणूक आयोगानं निवडणूक योग्य पद्धतीनं घेतली. मी कोणाचा तरी नातेवाईक आहे, म्हणून ईव्हीएम हॅक कसं होऊ शकतं? त्यामुळं विरोधकांना काय बोलायचं ते बोलू द्या," असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

विरोधकांकडून दिशाभूल : "विरोधक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा उलगडा करतील, वस्तुस्थिती वेगळी आहे. इतक्या जागा जिंकल्यावर तुम्ही ईव्हीएमवर शंका घेतली नाही, फक्त रवींद्र वायकर यांच्या मतदार संघात ईव्हीएमवर शंका घेताय. खोटे बोला पण रेटून बोला हे फार काळ टिकणार नाही'," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. रवींद्र वायकर यांना तेथील जनतेनं निवडून दिलं असून, त्यांचा विजय जनतेचा विजय आहे. तसंच खोटं बोलून महाविकास आघाडीनं मते घेतली, पण त्यांना मोदींना हटवता आलं नाही. त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याची टीका शिंदे यांनी केली.

'हे' वाचलंत का :

  1. आदित्य ठाकरेंची 'एनडीए' सरकारबाबत मोठी भविष्यवाणी; निवडणूक आयोगावरही हल्लाबोल - Aaditya Thackeray On NDA
  2. ईव्हीएम मशीनशी जोडलेला फोनच रवींद्र वायकरांच्या मेहुण्याने वापरला, पोलिसांच्या भूवया उंचावल्या - Ravindra Waikar
  3. खवय्यांसाठी पुण्यात चक्क 'लेडी बाऊन्सर' तैनात; काय आहे नेमकी भानगड? - Society Bouncers Pune

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.