ETV Bharat / state

खा. धानोरकर यांचा काँग्रेसच्याच बड्या नेत्यावर निशाणा, म्हणाल्या 'मला तिकीट न मिळण्यासाठी पक्षातील लोकांनीच दिली होती सुपारी' - MP Pratibha Dhanorkar - MP PRATIBHA DHANORKAR

MP Pratibha Dhanorkar : राजुरा लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी कॉंग्रेसच्या बड्या नेत्यावर कारस्थान रचल्याचा आरोप केलाय. आपल्याला कॉंग्रेस पक्षाकडून लोकसभेचं तिकीट मिळू नये यासाठी आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी कुणाचंही नाव न घेता सांगितलं.

MP Pratibha Dhanorkar
खासदार प्रतिभा धानोरकर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 7:09 PM IST

Updated : Jun 13, 2024, 7:55 PM IST

चंद्रपूर MP Pratibha Dhanorkar : निवडणूक निकालानंतर खा. प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्याविरोधात पक्षातच कट कारस्थान रचलं गेलं होतं हे स्पष्ट केलं आहे. तिकीट मिळू नये यासाठी आमच्याच पक्षातील लोकांनी आमदार सुभाष धोटे यांना सुपारी देण्याचा प्रयत्न केला. त्यांना आमिष दाखविण्यात आलं. मात्र, ते शेवटपर्यंत या आमिषांना बळी पडले नाहीत, असा गंभीर आरोप नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे नाव न घेता केला आहे. राजुरा शहरात आयोजित रॅलीनंतर धन्यवाद सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे. त्यामुळे धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधल्याची चर्चा आहे.

प्रतिभा धानोरकर वडेट्टीवारांवर टीका करताना (ETV Bharat Reporter)

काय आहे प्रकरण : खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता होती. अशातच विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार हिने या लोकसभा क्षेत्रात आपला दावा सांगितला. वडेट्टीवार यांनी देखील या दावेदारीचं समर्थन केलं होतं. त्यानंतर वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर यांच्यातला पक्षांतर्गत वाद शिगेला पोहोचला होता. यासाठी दोघांनी देखील दिल्ली गाठली होती; परंतु अनेक राजकीय नाट्यानंतर अखेर ही उमेदवारी प्रतिभा धानोरकर यांना देण्यात आली. लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय संपादन केला. या निमित्ताने राजुरा शहरात विजयी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यात धानोरकर यांनी वडेट्टीवार यांचं नाव न घेता आरोप केले.

भाजपाचा सफाया करणार-धानोरकर : भाजपाचा सफाया केला नाही तर नाव धानोरकर सांगणार नाही. आता मी खासदार झाले आहे. जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात कुणाला तिकीट द्यायचं हे माझ्याच हातात असणार आहे. त्यामुळे यावेळी भाजपा औषधाला देखील सापडणार नाही, असा शब्द मी देते. नाही तर नाव धानोरकर सांगणार नाही, असंही प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

आता पालकमंत्री राजुरा क्षेत्राचा बनणार : यापूर्वी पालकमंत्री पद हे गडचिरोली लोकसभा क्षेत्राला जायचं; मात्र जर राज्यात सरकार आलं तर यावेळी हे मंत्रिपद राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना मिळेल. यासाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार असंही धानोरकर म्हणाल्या. उल्लेखनिय बाब म्हणजे, विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत जे गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येतं.

हेही वाचा:

  1. पब-जी गेम खेळण्याच्या नादात सोळा वर्षीय मुलाचा अंबाझरी तलावात पडून मृत्यू - Maharashtra live updates news
  2. आईस्क्रीममध्ये सापडलं चक्क माणसाचं बोट, मालाड पोलिसांनी कंपनीविरोधात दाखल केला गुन्हा - HUMAN FINGER INSIDE IN ICE CREAM
  3. राज्यसभेची उमेदवारी डावलल्याच्या मुद्द्यावर काय म्हणाले छगन भुजबळ... - Chhagan Bhujbal

Last Updated : Jun 13, 2024, 7:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.