ETV Bharat / state

कृतज्ञता दौरा : नूतन खासदार प्रणिती शिंदेंचा दुधाच्या छोट्या गाडीतून प्रवास - Praniti Shinde Travel In Milk Tempo

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 13, 2024, 2:56 PM IST

Praniti Shinde Travel In Milk Tempo : नव्यानं निवडून आलेल्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी कृतज्ञता दौरा केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या घरी जाण्यासाठी रस्ता नसल्यानं त्यांनी दुधाच्या गाडीमधून प्रवास केला.

Praniti Shinde Travel In Milk Tempo
खासदार प्रणिती शिंदे (Reporter)

सोलापूर Praniti Shinde Travel In Milk Tempo : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये सोलापूर लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. सोलापूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांचा तब्बल 75 हजार मतांनी पराभव करत विजय संपादन केला. प्रणिती शिंदे यांनी वडिलांच्या पराभवाचा बदला घेत भाजपाच्या विजयाची हॅट्रिक रोखली. विजयानंतर खासदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढा मतदार संघामध्ये आभार आणि कृतज्ञता दौरा आयोजित करण्यात आला. या दौऱ्याच्या निमित्तानं खासदार प्रणिती शिंदे या मंगळवेढा तालुक्यातील पाटकळमध्ये आल्या. यावेळी त्यांनी आपली वातानुकूलित गाडी सोडून दुधाच्या टेम्पोमधून प्रवास केल्यानं मतदारसंघांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

दूध वाहतूक करणाऱ्या गाडीमधून प्रवास : सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा दौऱ्यात खोमनाळमध्ये चक्क दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून प्रवास केला.नेहमी वातानुकूलित चार चाकीमध्ये प्रवास करणाऱ्या खासदार शिंदे यांनी केलेल्या या प्रवासाची उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली. प्रणिती शिंदे यांनी कृतज्ञता दौरा आयोजित करुन त्या मतदारांचे आभार मानत आहेत.

कामसिद्ध देवाच्या यात्रेत लावली हजेरी : सध्याच्या काळात राजकीय नेते आणि त्यांच्या प्रवासाबद्दल नेहमी चर्चा होते. सोलापूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे आज खोमनाळ येथील ग्रामदैवत कामसिद्ध देवाच्या यात्रेत आल्या. यावेळी त्यांनी ग्रामदैवत कामसिद्धाचं खोमनाळ इथं दर्शन घेतलं. सोलापूर लोकसभेत प्रणिती शिंदे विजयी होणार की, राम सातपुते विजय होणार, यासाठी दहा हजार रुपयांची शर्यत लागली होती. ती शर्यत खोमनाळ येथील मच्छिंद्र इंगोले यांनी जिंकल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पालखीची मिरवणूक सुरू असतानाच शिंदे यांनी पालखीचं दर्शन घेतले.

कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत रस्ता नसल्यानं केला प्रवास : कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत रस्ता नसल्यानं गर्दीतून वाट काढण्यात अडचणीचं ठरू लागलं. यामुळे प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढ्यावरुन निंबोणीकडं दूध व्यवसाय करणाऱ्या गाडीमध्ये बसून काँग्रेस कार्यकर्ता सुधाकर कांबळे यांच्या घरापर्यंत सोडण्याची विनंती केली. सदर गाडीचालकानं तत्काळ त्यांना गर्दीतून वाट काढत नेऊन सोडलं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्याची इच्छा पूर्ण केली. राजकीय नेते शक्यतो एसटी आणि अन्य वाहनातून प्रवास केल्याच्या घटना दुर्मीळ आहेत. आज प्रणिती शिंदे यांनी अचानक अशा केलेल्या प्रवासाची चांगलीच चर्चा रंगली.

हेही वाचा :

  1. “माझ्या वडिलांना काय बोलता? भिडायचे असेल तर…”; राम सातपुते आणि प्रणिती शिंदे यांच्यात रंगला राजकीय कलगीतुरा - lok sabha elections
  2. कॉंग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या चारचाकीवर कुणी केला हल्ला? थेट पक्षाचं नाव सांगितलं! - Praniti Shinde attacked
  3. Praniti Shinde : कोविड लसीबाबत आमदार प्रणिती शिंदेंचा अजब दावा; म्हणाल्या...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.