ETV Bharat / state

खासदार औद्योगिक महोत्सव: अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भ, स्‍टार्टअप भारतीय अर्थव्यवस्थेचे इंधन असल्याचं तज्ञांचं मत - खासदार औद्योगिक महोत्सव

MP Industrial Festival: केंद्र सरकारने 'स्टार्टअप इंडिया' या योजनेची घोषणा केल्यानंतर गेल्या ७ वर्षांत स्टार्टअप्सची संख्या झपाट्यानं वाढली आहे. (Indian Economy) देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून स्टार्टअप उद्योग सुरू झालेले आहेत. आज स्टार्टअप हे भारतीय अर्थव्यवस्था चालविणारे इंधन ठरत आहे, अशी भावना ‘स्टार्टअप’ विषयावरील पॅनेल डिस्कशनमध्ये सहभागी झालेल्या तज्ञांनी व्यक्त केली.

MP Industrial Festival
खासदार औद्योगिक महोत्सव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 9:56 PM IST

अ‍ॅडव्‍हांटेज विदर्भ 2024 या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद

नागपूर MP Industrial Festival : खासदार औद्योगिक महोत्सवा अंतर्गत आज 'अ‍ॅडव्हांटेज विदर्भ' (Advantage Vidarbha) या विदर्भातील गुंतवणुकीला गती देणारा महोत्सव सुरू करण्यात आलाय. त्याच्या पहिल्या दिवशी ‘स्टार्टअप’ विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. (Startup India) यामध्ये ममाअर्थचे सहसंस्थापक वरुण अलग, कलारी कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक वाणी कोला यांचा सहभाग होता. नाविन्यपूर्ण संकल्पनांद्वारे आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या स्टार्टअप्सचे महत्त्व सरकारने ओळखले आहे. स्टार्टअप्सना आर्थिक, पायाभूत सुविधा आणि नियामक सहाय्य प्रदान करण्यासाठी विविध मंत्रालये आणि विभागांनी योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारने स्टार्टअप इंडियाची घोषणा केल्यानंतर मागील ७ वर्षांत स्टार्टअप्सची संख्या झपाट्यानं वाढली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून स्टार्टअप सुरू होत आहेत. या संधीचा लाभ घेत उद्यमींनी स्वत:च्या नवसंकल्पांना मूर्त स्वरूप देण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली.

छोट्या शहरांना अधिक संधी: स्टार्टअप केवळ मोठ्या शहरांपुरते मर्यादित राहिलेले नाही. उलट येणारे दशक स्टार्टअपच्या दृष्टीनं छोट्या शहरांसाठी लाभदायी ठरणार आहे. ग्रामीण भारतातील रहिवासी देखील डिजिटली साक्षर झाले आहेत. आज भारतात १ लाख १० हजारहून अधिक स्टार्टअप यशस्वीरित्या कार्यरत आहेत. भारतीय मानसिकता लक्षात घेता भविष्यात स्टार्टअप क्षेत्र अधिक गती पकडणार आहे, अशी माहिती कलारी कॅपिटलच्या व्यवस्थापकीय संचालक वाणी कोला यांनी दिली.

ऐतिहासिक वारशाचे केले ब्रॅण्डिंग: भारतीय संस्कृती ५ हजार वर्षे जुनी असल्याचं सांगण्यात येते. इतक्या जुन्या ऐतिहासिक वारशामध्ये सौंदर्य खुलविण्यासाठी विविध नुस्खे सांगण्यात आले आहेत. ती माहिती पिढ्यानपिढ्या वारसा रूपाने मिळत आहे. या ऐतिहासिक वारशाचे चांगले ब्रॅण्डिंग करता येणे शक्य असल्याचे जाणवले आणि त्यातूनच आज उबटण, फेसवॉश वा फेसमास्क यासारखी उत्पादने सर्वाधिक विकल्या जात असल्याचे ममाअर्थचे सहसंस्थापक वरुण अलग म्हणाले. त्यांनी यावेळी सौंदर्य प्रसाधन क्षेत्रातील उलाढाल तसेच स्टार्टअपची दशा आणि दिशा याबाबत मार्गदर्शन केले आहे.

हेही वाचा:

  1. मराठ्यांच्या पदरात काय पडलं? 'मनोज जरांगे पाटील यांच्या डोळ्यात चक्क धूळफेक'
  2. तोडगा निघाला याचा आनंद; ओबीसींवर अन्याय होणार नाही असाच तोडगा - देवेंद्र फडणवीस
  3. रामाचं राज्य असतं तर, मराठ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती; संजय राऊतांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.