ETV Bharat / state

खासदार इम्तियाज जलील मुंबईमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक, काय आहे कारण? - खासदार इम्तियाज जलील

MP Imtiaz Jalil: एमआयएम पक्ष आता मुंबईत लोकसभा निवडणूक लढवत आपलं नशीब आजमावणार आहे. त्यासाठी औरंगाबाद मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी देण्यात येऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी निर्णय घेतील, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

MP Imtiaz Jalil
खासदार इम्तियाज जलील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 10:03 PM IST

खासदार इम्तियाज जलील मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यामागचं कारण सांगताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) MP Imtiaz Jalil : "मुंबईसारख्या ठिकाणी मिरा रोडची दंगल घडली. त्यावेळी एक व्हिडीओ समोर आला. त्यात वीस वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या लोकांना उद्ध्वस्त करण्यात आलं. राजनीतिक वर्चस्व दाखवण्यासाठी त्यांनी बुलडोझर चालवले. त्यावेळी त्यांच्या बाजूनं कोणत्याच पक्षाचे मुस्लिम आमदार किंवा इतर नेते उभे राहायला तयार नव्हते. गोर-गरिबांवर अत्याचार होतो. बुलडोझर चालवला जातो. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आपण का उभे राहू नये? इकडे २० वर्षांपासून प्रस्थापित खासदार असताना मला छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडून दिलं. त्यामुळे मी मुंबईतदेखील निवडून येईल. आमच्याकडून तिकडच्या लोकांना अपेक्षा आहेत," असं देखील खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीत जाण्यासाठी लाचारी नाही: "महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी मी लाचारी दाखवणार नाही. मात्र आजही त्यांना सांगतो भाजपाला हरवायचं असेल तर एमआयएमला हलक्यात घेऊन नका. प्रकाश आंबेडकर यांना काय पाहिजे मी कसं सांगणार? मात्र मी कुणाच्या दारात उभे राहून जागा मागणार नाही. ८-१० दिवसात इंडिया आघाडी राहते की नाही हा प्रश्न आहे. साम, दाम, दंड वापरून आपल्याला केंद्राच्या निवडणुका लढवायच्या आहेत. आम्ही आमची ताकद दाखवून राहू. माझा एवढा आत्मविश्वास असेल तर तो तुम्हाला निवडणुकीनंतर कळेल. आमची प्लानिंग झाली आहे," असंदेखील इम्तियाज जलील म्हणाले.

भाजपापेक्षा घाणेरडं राजकारण कोणी केलं नाही. तुम्ही तुमच्या मतदारांसाठी प्रामाणिक नाही. एमआयएमने नवीन नवीन जागा शोधणं गरजेचं आहे. लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगरमधून अनेक नेते आहेत. मुंबईसाठी मी फक्त इच्छा व्यक्त केली. मात्र निर्णय झाला नाही. याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील- खासदार इम्तियाज जलील

माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी समोर यावं: "भाजपा नेते केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे माझ्यावर काय काम केले? असा आरोप करतात. मात्र, या शहरानं २०१४ मध्ये खूप प्रेम दिलं. २८ दिवसात आमदार आणि २२ दिवसात खासदार झालो. दहा वर्षांत समाधानी आहे. लोकांच्या विश्वासावर खरा उतरण्यासाठी काम करतोय. मी आपल्याला आव्हान करतो की वेळ, जागा, तारीख तुम्ही ठरवा आणि मीडियासमोर मी काय केलं आणि तुम्ही काय केलं हे मला विचारायची हिम्मत दाखवा. कोविडमुळे मी तीन वर्ष खासदार राहिलो. तुम्ही २० वर्ष खासदार होता. कुणी कोणतं काम केलं ते समोरासमोर ठरवू," असं आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं.

हेही वाचा:

  1. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याची मागणी घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका
  2. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर राजकीय सुंदोपसुंदी, छगन भुजबळांनी काय उपस्थित केले प्रश्न?
  3. परवानगी द्या, शिवजयंतीपासून आम्ही शिवप्रेमी स्मारकाचं काम हाती घेऊ- विनोद पाटील यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.