नांदेड MP Ashok Chavan on Manoj Jarange : रविवारी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. तसंच त्यांनी फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलनाची भूमिका घेतलीय. यावरुन राज्यातील वातावरण चांगलच तापलं असून यावरुन आता आरोप- प्रत्यारोप होत आहेत. यावर आता खासदार अशोक चव्हाण यांनीही आपलं मत व्यक्त केलंय.
काय म्हणाले अशोक चव्हाण : नांदेड इथं पत्रकारांशी बोलताना जरांगेंच्या आरोपांवर खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, "सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात समन्वयातुन यावर मार्ग निघावा अशी ईच्छा आहे. आजचं चित्र काळजी करण्यासारखं आहे." तसंच फडणवीस यांच्यावर जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांबद्दल विचारलं असता अशोक चव्हाण यांनी त्यावर बोलणं टाळलं.
समाजाची फसवणूक करणार नाही : दरम्यान जरांगेंच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "सरसकटच्या अधिसूचनेवर 6 लाख हरकती आल्या आहेत. कायदेशीर बाबी पूर्ण करुन निर्णय घ्यावा लागेल. कोणत्याही घाईगडबडीत निर्णय घेऊन चालणार नाही. कोणाचीही फसवणूक करणार नाही. विरोधी पक्षांनी आरक्षणसाठी सहकार्याची भूमिका घ्यावी. आरक्षण टिकणार नाही, असं सांगून मराठा समाजाचं खच्चीकरण करु नका." तसंच सरकार कमी पडत असलेल्या गोष्टी दाखवून द्या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आंदोलनकर्त्यांनी सरकारनं केलेल्या गोष्टींची जाणीव ठेवावी. अराजकता पसरवणाऱ्या काही लोकांच्या कटकारस्थानापासून सावध व्हा, असंही आवाहन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलंय.
जरांगेंची भाषा राजकीय : पुढं बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांची लोकांसाठी भावना होती, तेव्हा मी स्वतः त्यांच्या बरोबर होतो. आता मात्र त्यांची भाषा राजकीय वाटत आहे. त्यांच्या बोलण्यातून राजकीय वास येत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असं बोलणं ही आपली संस्कृती नाही. हे त्यांना कोणी बोलायला लावतं का? हे पाहावं लागेल. महाराष्ट्र हे सहन करणार नाही."
हेही वाचा :