ETV Bharat / state

पुणे कार अपघात प्रकरण; बदललेले 'ते' रक्ताचे नमुने आरोपीच्या आईचे - Pune Porsche Accident Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 8:06 PM IST

Updated : Jun 2, 2024, 8:34 PM IST

Pune Porsche Accident Case : कल्याणीनगर अपघातात प्रकरणामध्ये सातत्याने नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात अल्पवयीन आरोपी निर्दोष सिद्ध व्हावा म्हणून, आरोपीची आई शिवानी अगरवालचे (Shivani Agarwal) रक्ताचे नमुने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Porsche Accident Case
पुणे कार अपघात प्रकरण (ETV BHARAT MH DESK)

पुणे Pune Porsche Accident Case : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईला देखील पोलिसांनी अटक केलीय. शिवानी अगरवाल यांनी रक्ताच्या नमुन्यांमध्ये छेडछाड केली असून मुलाच्या नमुन्यांऐवजी स्वतःचे नमुने सादर केल्याचं पोलिसांच्या चौकशीत समोर आलंय. तर आज शिवानी अगरवाल (Shivani Agarwal) आणि विशाल अगरवाल (Vishal Agarwal) या दोघांनाही न्यायालयानं 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ते रक्ताचे नमुने आईचेचं : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससून रुग्णालयात रक्ताच्या नमुन्यांची फेरफार करण्यात आली होती. कोणाच्या रक्ताचे नमुने ससूनमध्ये देण्यात आले आहेत याबाबत चर्चा सुरू असताना, पोलिसांच्या तपासात त्या अल्पवयीन आरोपीच्या रक्ताच्या नमुण्याऐवजी आईंचेच रक्त देण्यात आले असल्याचं सिद्ध झालंय.

आरोपींचे डीएनए सँपल घ्यायचं आहे : आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत चौकशी अधिकारी यांनी न्यायालयात माहिती दिली की, साक्षीदार एफएसएल यांच्या तपासातून निष्पन्न झालं की, अल्पवयीन आरोपीच्या रक्ताऐवजी आईचे रक्त वापरण्यात आले आहे. या सगळ्या षडयंत्रामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता आहे. तसेच विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवाल या दोन्ही आरोपींचे डीएनए सँपल घ्यायचं आहे. तसेच ३ लाख रुपये कोणाकडून घेतले आहेत याचा देखील तपास करायचा आहे. मूळ रक्ताचे नमुने आणि त्यातील सिरींज कोणाला दिली याचा शोध घ्यायचा आहे. तसेच विशाल आणि शिवानी अगरवाल यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे.

ससूनमध्ये जायला कोणीतरी सांगितलं ?: न्यायालयात सरकारी वकील यांनी विधी संघर्ष बालकाचे हे पालक आहेत. रक्त बदलण्याच्या प्रकरणात पालकांचा थेट समावेश आहे. शिवानी अगरवाल यांना ससूनमध्ये जायला कोणीतरी सांगितलं आहे. रक्ताचे नमुने देण्यासाठी शिवानी यांना कोणी सांगितलं यासाठी तपास करायचा आहे. सखोल चौकशीसाठी ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद केलाय.

5 जूनपर्यंत पोलीस कोठडी : यावेळी आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवादात सांगितलं की, १९ तारखेला अपघात झाल्यानंतर घराची झाडाझडती घेण्यात आली आहे. सीसीटीव्हीसुद्धा जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलिसांना सरेंडर केलंय. तपास अधिकाऱ्यांना कधीही गरज लागली तर आरोपी हजर राहतील म्हणून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी. युक्तिवादानंतर न्यायालयाने विशाल अगरवाल आणि शिवानी अगरवाल यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा -

  1. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण ; अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह आजोबाला कोठडी, जाणून घ्या काय आहे अपघाताची ए टू झेड कहाणी - Pune Porsche Accident Case
  2. 'मी' मध्यमवर्गीय असल्यानं माझ्यावर पोर्श कार अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, आर्यन नीखराचा आरोप - Pune hit and run case
  3. विशाल अग्रवाल यांनी वडील म्हणून आपलं कर्तव्य पार पाडलं नाही, २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी - Asim Sarode Blames Vishal Agarwal

Last Updated : Jun 2, 2024, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.