ETV Bharat / state

कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकाचा तळ्यात बुडून मृत्यू - Mother and child drowned - MOTHER AND CHILD DROWNED

Mother and child drowned : कपडे धुण्यासाठी गेलेल्या माय-लेकाचा शेत तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उरण तालुक्यातील पिरकोन गावात ही हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी पाच साडेपाचच्या सुमारास घडली.

माय-लेकाचा तळ्यात बुडून मृत्यू
माय-लेकाचा तळ्यात बुडून मृत्यू (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 12:38 PM IST

नवी मुंबई Mother and child drowned : मुलाला सोबत घेऊन कपडे धुण्यासाठी गेलेल्या आईचा मुलासह बुडून मृत्यू झालाय. उरण तालुक्यातील पिरकोन गावात ही हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी घडली. नीरा जगदीश पाटील वय (25 वर्ष), रिहान जगदीश पाटील वय (7 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.

नेमकं काय घडलं? : अधिक माहिती अशी की, नवी मुंबई परिमंडळ दोनच्या हद्दीत येणाऱ्या उरण तालुक्यातील पिरकोन गावातील नीरा पाटील या त्यांचा मुलगा रिहान पाटील याला घेऊन तळ्याकाठी कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नीरा या कपडे धुवत असताना रिहानचा पाय घसरला आणि रिहान पाण्यात पडला. रिहान पाण्यात पडल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी आई नीरा हिनं देखील पाण्यात उडी मारली. त्यानंतर दोघेही पाण्यात बुडाले.

दोघांचे मृतदेह आढळून आले : रविवारी संध्याकाळी पाच साडेपाचच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेले नीरा आणि त्यांचा मुलगा रिहान संध्याकाळी 7 वाजून गेले तरी परत न आल्यानं नीरा यांचे सासरे जयवंत नामदेव पाटील हे तळ्याकाठी पाहण्यासाठी आले. त्यांना तळ्याकाठी धुण्यासाठी आणलेले कपडे आणि चपला दिसून आल्या. मात्र नीरा आणि रिहान काही दिसले नाहीत. त्यामुळं त्यांनी आजूबाजूला शोध घेतला. तळ्याच्या जवळ असलेल्या एका घरात हळदीचा कार्यक्रम होता. त्यामुळं नीरा यांचे सासरे जयवंत यांना वाटलं नीरा आणि रिहान तिथं गेले असतील. त्यांनी तिथंही विचारणा केली असता, तिथंही ते दोघं आले नसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तळ्यात तर बुडाले नसतील ना? अशी शंका त्यांच्या मनात आली आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला. ग्रामस्थ तळ्याकाठी आले. त्यांनी शोध कार्य सुरू करताच काही वेळात नीरा आणि त्यांचा मुलगा रिहान दोघांचेही मृतदेह आढळून आले.

परिसरात शोककळा : सरकारी रुग्णालयात आई मुलाचा मृतदेह पाठवण्यात आला व शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्या नंतर त्यांच्यावर अंत्यत दुःखद वातावरणात सोमवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच घरातील दोघांचा अशा पद्धतीनं मृत्यू झाल्यामुळं पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. उरण पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलीय, असं पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितलंय.

हेही वाचा

  1. मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट! - Maharashtra Weather Update
  2. ...तर गुजरातच्या जीएसटी आयुक्तांची महाबळेश्वरातील ६४० एकर जमीन होणार जप्त, आज निर्णय होणार - Mahabaleshwar land scam case
  3. घाटकोपर होर्डींग दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी, 13 मे रोजी घडली होती दुर्घटना - Ghatkopar Hoarding Incident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.