ETV Bharat / state

बदलापूर पाठोपाठ मुंबईत आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - Molestation - MOLESTATION

Molestation - बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असतानाच मुंबईतही नागपाडा परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार घडला आहे. वाचा सविस्तर वृत्त

प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र (File image)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 21, 2024, 10:10 AM IST

मुंबई Molestation : बदलापूर मधील शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं बदलापुरात काल जनसामान्यांचा रोष पाहायला मिळाला. आज देखील या घटनेमुळे बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे. त्यातच मुंबईत चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्यानं संताप व्यक्त केला जात आहे. नागपाडा परिसरात ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानं खळबळ उडाली आहे.

कानातले डुल विविध प्रकारची कर्णफुलं विकणाऱ्या एकानं आठ वर्षीय चिमुकलीचं लैंगिक शोषण केलं. या चिमुरडीला कानातले दाखवण्याच्या नावाखाली तिचं लैंगिक शोषण केलं. या प्रकरणी पोलिसांनी लगेच कारवाई केलीय. कानातले टॉप्स विक्री करणाऱ्या झुबेर शाहला नागपाडा पोलिसांनी अटक केली आहे. शेजारी उभ्या असलेल्या महिलेनं नराधमाचं कृत्य बघून आरडाओरडा केला आणि पळून जात असताना झुबेर शाह याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं. याप्रकरणी विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती नागपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेशकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

पॉस्को कायदा कलम 8, 12 आणि भारतीय न्याय संहिता कलम 74 अन्वये नागपाडा पोलीस ठाण्यात काल रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच स्थानिकांनीच काल रात्री घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं, त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे.

बातमी अपडेट होत आहे....

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.