ETV Bharat / state

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक; नाना पटोले म्हणाले, "कायदा आणि सुव्यवस्था..."

नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात बाचोटी येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांची गाडी अडवून घोषणाबाजी देखील केली.

Nana Patole reaction on stone pelted on obc leader Laxman Hake car in Nanded
लक्ष्मण हाके, नाना पटोले (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2024, 7:55 AM IST

नांदेड : सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार या विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होत असल्याचं पहायला मिळतंय. या मतदारसंघात जनहित पक्षाचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्याच प्रचारासाठी बाचोटी इथं सभेसाठी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आले होते. प्रचार सभा संपवून परत जात असताना अचानक काही मराठा आंदोलकांनी त्यांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून ओबीसी आंदोलक देखील आक्रमक झाले. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. या घटनेनंतर लक्ष्मण हाके हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतय.

काय म्हणाले लक्ष्मण हाके? : या घटनेनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना लक्ष्मण हाके म्हणाले की, "प्रचार सभा झाल्यानंतर आम्ही परत जाताना अचानक 100 ते 150 तरुण गाडीसमोर आले. त्यांनी चेहरे पांढऱ्या रुमालांनी झाकले होते. त्यांच्या हातात लाठ्या होत्या आणि त्यांनी आमच्यावर भ्याड हल्ला केला. त्यावेळी माझ्यासोबत लोहा मतदारसंघातील उमेदवार होते. ते तरुण गाडीवर चढले आणि त्यांनी 'एक मराठा, लाख मराठा'च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. जेव्हा आम्ही गाडी थोडी पुढं घेतली तेव्हा त्यांनी मागून गाडीवर दगडफेक केली, ज्यात गाडीच्या काचा फुटल्या. आमच्यावर भ्याड लोकांनी हल्ला केला. अरे तोंड बांधून काय हल्ला करता? हल्लाच करायचाय तर आमने-सामने या", असं आव्हान हाके यांनी दिलं.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक (ETV Bharat Reporter)

हल्ल्या विरोधात मोर्चा काढणार : पुढं ते म्हणाले की, "आम्ही या महाराष्ट्राचे नागरिक आहोत. आम्ही ओबीसींच्या बाजूनं बोलायचं नाही का? आम्ही निवडणुकीला उभं रहायचं नाही का? राज्यातील ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जातोय. ओबीसी समाजातील व्यक्ती विधानसभेला उभे राहिलेले यांना आवडत नाही," असं म्हणत हाके यांनी शुक्रवारी (8 नोव्हेंबर) कंधारच्या पोलीस ठाण्यासमोर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं.

नाना पटोले यांचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल : या घटनेवरुन कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही. पोलीस महासंचालक असलेल्या रश्मी शुक्ला यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार करुन त्यांना हटवलं. त्या रिटायर झालेल्या अधिकारी आहेत. या घटनेला दोन वर्ष झालेत. मात्र, अद्यापही रेगुलर पोलीस महासंचालकाची नियुक्ती झालेली नाही. त्यामुळं महाराष्ट्रात पोलीस विभागामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय. तसंच महायुती सरकार आल्यापासून कोणाचाही जीव सुरक्षीत नाही. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्था चांगली करण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे."

हेही वाचा -

  1. मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार; लक्ष्मण हाके म्हणाले, "बारामतीमधून आदेश..."
  2. जरांगे पाटील 'येडा' माणूस; ओबीसी 'या' उमेदवारांना मतदान करणार नाही, लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
  3. मला जीवे मारण्याचा पूर्वनियोजित कट, लक्ष्मण हाके यांचा आरोप; म्हणाले "मद्यपान केल्याचा पुरावा दाखवा" - Laxman Hake Allegations

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.