ETV Bharat / state

बहिणीला दिला ४ महिने त्रास, आता आणली लाडकी बहीण योजना : जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाना - Ladaki Bahin Yojana - LADAKI BAHIN YOJANA

Jitendra Awhad criticize Ajit Pawar : आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लाडकी बहीण योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केलीय. "ज्यांनी स्वतःच्या बहिणीला मागील चार महिने त्रास दिला. तेच आता लाडकी बहीण योजना राबवत आहेत, असा खोचक टोला त्यांनी पवारांना लगावला आहे.

Jitendra Awhad criticize Ajit Pawar
अजित पवार, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड (Etv Bharat MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 10:58 PM IST

मुंबई Jitendra Awhad criticize Ajit Pawar : मध्यप्रदेशच्या धर्तीवर महिलांना खुश करण्यासाठी राज्यसरकानं अर्थसंकल्पात मोठी घोषणा केलीय. अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. सरकारच्या या योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार, जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तर, आव्हाड यांच्या टीकेला अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याच शब्दात प्रत्त्युतर दिलं आहे.

सुप्रिया सुळेंना 4 महिने त्रास : अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कारकीर्दीतील 10 वा महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सरकारनं अनेक घोषणांचा पाऊस पडला. मध्यप्रदेशच्या धर्तीवर चालू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभव पत्कारावा लागलाय. यादरम्यान शरद पवारांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागला. यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर टीकास्त्र सोडलंय. "ज्यांनी स्वतःच्या बहिणीला मागील चार महिने त्रास दिला. तेच आता लाडकी बहीण योजना राबवत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. त्यातच त्यांना उशिरा सुचलेलं, हे शहाणपण असल्याचे ते म्हणाले.

चुका कोणाकडून होत नाहीत : जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला देखील अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. अजित पवार म्हणाले, "हो आम्हाला हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, असं कोणाला वाटत असेल, तर तसं असू द्या. त्यामध्ये वाईट काय आहे. आम्ही फक्त हवेत घोषणा करत नाही, तर त्या अमलात आणतो. चुका कोणाकडून होत नाहीत. चुका सर्वांकडूनच होतात. ज्यांनी इतकी वर्षे फक्त घोषणा केल्या, त्यांनी काय केलं हे त्यांना विचारा. आम्ही आमचं काम करत राहू. राज्यातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची अशी ही योजना आहे".

काय आहे योजना : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या घोषणेच्या अनुषंगानं महिलांना प्रत्येक महिन्याला 1 हजार 500 रुपये मिळणार आहेत. महिलांसाठी ही एक व्यापक, महत्त्वकांक्षी योजना असून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्षांपर्यंतच्या महिला पात्र राहणार आहेत. त्याचबरोबर या योजनेमुळं सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. जुलै 2024 पासून ही योजना अंमलात येणार आहे.

'हे' वाचलंत का :

  1. थापा आणि निवडणूक जुमल्यांचा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांची सरकारवर सडकून टीका - Opposition on Maharashtra Budget
  2. गाजर देणारा नव्हे तर विकासाचा गजर करणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Maharashtra Budget Session 2024
  3. राज्यात पुन्हा ‘डबल इंजिन’चं सरकार येणार”; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती - Chandrashekhar Bawankule

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.