ETV Bharat / state

आमदार जयकुमार गोरेंवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, याचिकेवर ५ जुलै रोजी उच्च न्यायालयात सुनावणी - MLA Jayakumar Gore

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 10:57 PM IST

MLA Jayakumar Gore : साताऱ्यातील मायणी मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयात कोरोना काळामध्ये आमदार जयकुमार गोरेंनी कोट्यवधीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप दीपक देशमुख यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

MLA Jayakumar Gore
आमदार जयकुमार गोरे (ETV Bharat Reporter)

सातारा MLA Jayakumar Gore : कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून आमदार जयकुमार गोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर येत्या 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आमदार जयकुमार गोरेंसह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयितांविरुद्ध तातडीनं गुन्हे दाखल करून चौकशी करावी, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

भ्रष्टाचार उघड होऊनही कारवाई नाही : मायणी मेडिकल कॉलेजच्या विकासासाठी काढलेली कर्जे भागविण्यासाठी आमदार गोरेंना मेडिकल कॉलेजची भागीदारी देण्यात आली. मात्र, त्यांनी एक रुपयाचेही कर्ज भागविले नाही. उलट दुष्काळी भागात शून्यातून मेडिकल कॉलेज उभारणाऱ्या एम. आर. देशमुखांवरच ईडीने कारवाई केली. वास्तविक, कोरोना काळात आमदार गोरेंनी केलेला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार उघड होऊनही त्यांच्यावर कसलीही कारवाई झाली नाही, असा आरोप दीपक देशमुख यांनी यापूर्वी केला होता.

संस्थेच्या तत्कालीन अध्यक्षांना ईडीने केली होती अटक : मायणी मेडिकल कॉलेजमध्ये सन २०१२-१३, १३-१४ व १४-१५ या तीन वर्षांतील एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश न्यायालयाने अनियमित ठरवून २० कोटी रुपयांचा दंड ठोठावला. तो दंड संस्थेकडून वसूल करण्याचे आदेशही शासनास दिले होते. तसेच मेडिकल कॉलेजमध्ये खोटी यंत्रसामुग्री खरेदी दाखवून मनी लाँड्रिंग आणि बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांकडून मेडिकलच्या अ‍ॅडमिशनसाठी भरमसाठ पैसे घेतल्याप्रकरणी ईडीने १० मे २०२२ रोजी तत्कालीन चेअरमन एम. आर. देशमुख यांना अटक केली होती.

हेही वाचा:

  1. ...तर तुमच्या मिशा कापू; सोलापुरातील महिला संघटनेचा संभाजी भिडेंना कडक इशारा - Vidya Lolage on Sambhaji Bhide
  2. हिंदू धर्म हा भीती, द्वेष पसरवत नाही, मात्र भाजपावाले तेच करतात: राहुल गांधी यांचा लोकसभेत घणाघात - Rahul Gandhi in Lok Sabha
  3. नायब राज्यपाल व्ही के सक्सेना मानहानी प्रकरण: मेधा पाटकर यांना पाच महिन्यांच्या कारावासाची शिक्षा - Medha Patkar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.