ETV Bharat / state

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं अपहरण करून पाजली बियर अन् केला बलात्कार - Minor Girl Rape Case - MINOR GIRL RAPE CASE

Minor Girl Rape Case : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला एका ढाब्यावर बियर पाजली. त्यानंतर तिला नशा झाल्यानं नजीकच्या एका इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्वेतील मंगलगड मार्गावर असलेल्या एका गावात घडली आहे.

Minor Girl Rape Case
रेप केस (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 10:39 PM IST

Updated : Jun 9, 2024, 10:22 PM IST

ठाणे Minor Girl Rape Case : खळबळजनक बाब म्हणजे, नराधम हा पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अपहरण आणि अत्याचारासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून नराधमाला अटक केली आहे. तर त्याला या गुन्ह्यात साथ देणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहे. आशिष पांडे असं अटक नराधमाचं नाव आहे. तर गुन्ह्यात मदत करणाऱ्या अभिशेख डेरे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अत्याचाराचा व्हिडीओ केला कॅमऱ्यात कैद : पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन १४ वर्षीय मुलगी कल्याण पूर्वेत कुटुंबासह राहते. अटक नराधम हाही त्याच परिसरात राहत असून तो पीडित मुलीच्या वडिलांचा मित्र आहे. त्यामुळं पीडित मुलगी त्याला ओळखत होती. त्यातच ६ जून रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी गप्पा मारण्यासाठी गेली असता, दुपारच्या सुमारास तिला त्या परिसरात पाहून नराधम आशिषने तिला तुझ्या वडिलांनी तुला बोलावले असे बोलून थाप मारली आणि पीडितेला आरोपी अभिशेख डेरे याच्या दुचाकीवर तिघेही बसून तिचे अपहरण केले. अपहरण केल्यानंतर तिला एका ढाब्यावर नेऊन तिच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देऊन तिला बियर पाजली. स्वतःही नराधम बियर पिऊन झाल्यानंतर त्याच परिसरात एका इमारतीमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. शिवाय पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, आरोपीनं अत्याचार करतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कॅमेऱ्यात घेतला.

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल : पीडित मुलगी सायंकाळ झाली तरीही घरी आली नाही म्हणून आई-वडिलांनी तिचा शोध सुरू केला असता, रात्रीच्या सुमारास मुलगी राहत असलेल्या इमारतीच्या आवारात दिसली; मात्र बियर पिलेल्या अवस्थेत असल्याने तिला घरच्यांनी तातडीने घरी नेलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ७ जून रोजी तिच्याकडे आई-वडिलांनी चौकशी केली असता, तिच्यावर गुजरलेला प्रसंग तिने आईला सांगितला. आईने पीडित मुलीला घेऊन कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठत नराधम आशिष आणि त्याला मदत करणाऱ्या अभिशेख डेरेवर भादंवि कलम ३६३, ३६६(ए ) , ३७६ (२) (जे ) ३७६ (२) (जे) सह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करत काही तासातच नराधमाला अटक केली.

फरार आरोपीचा शोध सुरू : या गंभीर प्रकरणात भाजपाच्या एका माजी नगरसेवकाचं नाव पीडित मुलीच्या वडिलांनी घेतल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाशी आपला काहीच संबध नसल्याचं भाजपाचे माजी नगरसेवक यांनी सांगून आरोप फेटाळून लावले आहे; मात्र या धक्कादायक घटनेमुळं पुन्हा एकदा कल्याण शहरात खळबळ उडाली आहे. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्याशी संपर्क साधला असता, आरोपीला आज (८ जून) न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. सध्या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. नीट परीक्षेची सीबीआय चौकशी करा; शिक्षक, पालकांची मागणी - Neet Exam
  2. कोल्हापूरशी जुळली होती रामोजी रावांची नाळ; 90 च्या दशकात ऐतिहासिक जयप्रभा स्टुडिओला दिली होती भेट - Ramoji Rao Passed Away
  3. कीर्तिकर यांच्या ऐवजी आम्हाला जागा मिळाली असती तर,...; कीर्तिकरांच्या पराभवावर काय म्हणाले नाना पटोले? - Congress Party

Last Updated : Jun 9, 2024, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.