ETV Bharat / state

संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात : कारची पिकअपला धडक - Sanjay Rathode Car Accident

Sanjay Rathode Car Accident : मंत्री संजय राठोड यांच्या कारनं पिकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चालक गंभीर जखमी झाला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 40 minutes ago

Sanjay Rathode Car Accident
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

यवतमाळ Sanjay Rathode Car Accident : यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात पालकमंत्री संजय राठोड यांचा चालक जखमी झाला आहे. सुदैवानं गाडीच्या एयर बॅग वेळेवर उघडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हा अपघात इतका भीषण होता, की संजय राठोड यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं. तर पिक अप वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात यवतमाळ वाशिम रोडवर शुक्रवारी पहाटे सव्वा दोन वाजताच्या दरम्यान दिग्रस जवळील कोपरा इथं झाला.

पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाचा अपघात : वाशिम जिल्ह्यातील पोहरा देवी इथं 5 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकार्पण सोहळ्यानिमित्त येत आहेत. याच कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंत्री संजय राठोड हे पोरा देवी इथं गेले होते. दरम्यान रात्री दोन सव्वा दोन वाजता ते परत येत असताना पिक अप वाहन आणि त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात संजय राठोड यांचा चालक जखमी झाला आहे. दिग्रस जवळील कोपरा इथं पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनानं पीकअप वाहनाला जोरदार धडक दिली. मंत्री संजय राठोड यांच्या वाहनानं पिक अपला मागून दिलेली धडक इतकी जोरदार होती की पीक अप वाहन पलटी होऊन त्याचा चालक गंभीर जखमी झाला. तर संजय राठोड यांच्या वाहनाचा समोरील भाग चक्काचूर झाला. वाहनातील एअर बॅग उघडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमी चालकावर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

संजय राठोड यांच्या कारचा भीषण अपघात : कारची पिकअपला धडक (Reporter)

हेही वाचा :

  1. Sanjay Rathod: 75 हजार युवकांना रोजगार देण्याचा संकल्प - संजय राठोड
  2. Sanjay Rathod Cleancheat Report संजय राठोड यांचा क्लीनचिट अहवाल आला समोर
  3. Sanjay Rathod: यानंतर असेच आरोप होत राहीले तर कायदेशीर पाऊल उचलणार -संजय राठोड
Last Updated : 40 minutes ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.