ETV Bharat / state

महायुतीला 40 पेक्षा अधिक जागा मिळतील, मंत्री दीपक केसरकर यांना विश्वास - Deepak Kesarkar Opinion

Deepak Kesarkar Opinion : मुंबई आणि उपनगरात आगामी 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. राज्यात महायुतीला आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान महायुतीचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आपण 40 पेक्षा जास्त जागा जिंकू, असा दावा केला आहे. आम्ही राजकारण न करता विकासकामांना प्राधान्य देतोय, असं मत त्यांनी मांडलय.

Deepak Kesarkar Opinion
मंत्री दीपक केसरकर (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 15, 2024, 5:27 PM IST

लोकसभा निवडणुकीविषयी बोलताना मंत्री दीपक केसरकर (Reporter)

मुंबई Deepak Kesarkar Opinion : मुंबई आणि उपनगरात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान होणार आहे. या मतदानासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार करण्यात येत आहे. रॅली, सभा, मतदारसंघात लोकांना जाऊन भेटणे, मतदारांना मत देण्यासाठी आवाहन करणे आदी गोष्टी राजकीय पक्षांकडून होतानाचं चित्र सध्या मुंबईत आहे. महाराष्ट्रात 48 पैकी महायुतीला किती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? यावर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र आम्हालाच 40 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास महायुतीचे नेते आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी "ई टीव्ही भारत"ला दिलेल्या विशेष मुलाखतीत म्हटलं आहे.

आमचं विकासाला प्राधान्य : यावेळी मंत्री केसरकर म्हणाले की, आम्ही घरात बसून काम करणारे नाही. तर प्रत्यक्ष फिल्डवर उतरून तळागाळातील लोकांशी 'फेस टू फेस' बोलून त्यांच्या समस्या, दैनंदिन जीवनातील प्रश्न हे जाणून घेऊन काम करतो. राजकारणात आरोप-प्रत्यारोप तर होतच राहतील पण याचं राजकारण न करता विकासकामांना प्राधान्य देतो. आज मुंबईचा पालकमंत्री म्हणून मुंबईतील अनेक विकासकामं आमच्या सरकारनं केली आहेत. कोस्टल रोड, कचऱ्याचं विघटीकरण, शाळांमधील सुविधा, मुंबईकरांचा बस प्रवास, कोळी बांधव, मुंबईतील प्रदूषण, रस्त्यांची सफाई अशी विविध कामं ही आमच्या सरकारकडून होत आहेत. त्यामुळे विरोधकांना आम्ही कामातून उत्तर देतो, असं दीपक केसरकर म्हणाले.

विरोधकांचे आरोप बिनबुडाचे : आम्ही उठाव केल्यानंतर सतत आमच्यावर गद्दार..., खोके सरकार असा आरोप केला जातोय आणि घोटाळेबाज सरकार अशी टीका विरोधकांकडून होत आहे. आता मुख्यमंत्री हे 20-20 तास काम करतात. लोकांना भेटतात... लोकांची कामं करतात.... म्हणून राज्याचा दौरा करतात. अशावेळी त्यांना कपडे लागतात. नाशिकला कपड्यांच्या बॅगा नेल्या तरी, मुख्यमंत्री पैशाच्या बॅगा घेऊन नाशिकला गेले, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर केला आहे. विरोधकांना फक्त प्रत्येक ठिकाणी पैसाच दिसतोय. पण आमची कामं दिसत नाहीत. त्यामुळे विरोधकांचे जे आरोप आहेत, ते बिनबुडाचे आहेत, असंही केसरकर म्हणाले.

मराठी भवन उभारणार : मुंबईकरांसाठी अनेक विकासकामं आम्ही केली आणि पावसाळ्यात जे पाणी मुंबईत तुंबत होतं तिथं महापालिका कर्मचाऱ्यांना कामाला लावून पाणी कसं तुंबणार नाही, याची आम्ही खबरदारी घेतली आहे. मुंबईतील नालेसफाई असो किंवा मुंबईकरांचा प्रदूषण, आरोग्याचा प्रश्न आदी बाबींवर आम्ही सातत्याने काम करत आहोत. तसंच आगामी काळात आमच्याकडून भव्य-दिव्य असं मराठी भवन देखील उभारणार असल्याचं मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. "मंत्रीपद पाहिजे या हेतूनं तुमचं सरकारकडं लांगूलचालन..." संभाजी ब्रिगडेचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर हल्लाबोल - prafull patel
  2. महायुतीच्या उमेदवारांकरिता पंतप्रधान मोदी आज नाशिकसह कल्याणमध्ये घेणार सभा, मुंबईत करणार रोड शो - PM Modi Maharashtra visit
  3. हुकूमशहांचं डिपॉझिट जप्त करणारा विजय हवा : उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल - Uddhav Thackeray On Pm Modi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.