शिर्डी Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : "काँग्रेस सोबत जाणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून दूर जाणं हे त्यांनी नेहमी लक्षात ठेवावं. टोमणेबॉम्ब नको, लोकांना विकास हवा असतो," असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला. उद्धव ठाकरे राजकारणावर जास्त बोलत आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या हितावर बोलणं गरजेचं आहे. उद्धव ठाकरे यांचा मी खूप मान ठेवतो. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडं मागील कालावधीत दुर्लक्ष केलं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. ते आज शिर्डी इथं साई बाबा परिक्रमा सोहळ्यात बोलत होते.
टोमणेबॉम्ब नको, लोकांना विकास हवा असतो : "जगभरात सर्वे घेतल्यानंतर सर्वात जास्त लोकप्रिय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यात येतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाला दिशा देऊन जनतेसाठी काम केलं. लोकांना टोमणेबॉम्ब नको, विकास हवा असतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आपल्या भूमिकेचा फेरविचार करणं गरजेचं आहे," असंही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागं उभं राहिलं पाहिजे : "नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागं पूर्ण एक संघ उभं राहिलं पाहिजे. उद्धव ठाकरे यांनीही पुन्हा विचार करावा," अशी विनंती दीपक केसरकर यांनी यावेळी केली.
शिर्डी परिक्रमा महोत्सव आनंददायी क्षण : आज साई बाबांच्या शिर्डीत परिक्रमा महोत्सव सुरू आहे. या परिक्रमा महोत्सवात मंत्री दीपक केसरकर हे देखील सहभागी झाले. यावेळी त्यांनी "परिक्रमेच्या माध्यमातून शिर्डी ग्रामस्थांनी साईभक्त सुंदर अशी मिरवणूक काढतात. शिर्डी परिक्रमा म्हणजे अतिशय आनंददायी क्षण. शिर्डी परिक्रमा महोत्सवाची महती दिवसेंदिवस वाढत चालली आहे," असं मत मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा :