ETV Bharat / state

उन्हाळी सुट्टीत गावाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी हे रेल्वेचे वेळापत्रक पाहा मगच घराबाहेर पडा - Train Schedule - TRAIN SCHEDULE

Train Schedule : उन्हाळी सुट्टीमध्ये अनेकजण गावी तर अनेकजण पिकनिकसाठी घराबाहेर पडत आहेत. दूरच्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी रेल्वे प्रवास हा चांगला पर्याय आहे आहे. त्यामुळं अनेकजण रेल्वेने प्रवास करतात. मात्र, पुढील नऊ दिवस जर तुम्ही रेल्वेने प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर जरा थांबा! का? त्यासाठी वाचा सविस्तर बातमी

Etv Bharat
रेल्वे फाईल फोटो (Railway File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 7:48 PM IST

मुंबई Train Schedule : उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त गावाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 24 डब्यांच्या मेल एक्स्प्रेससाठी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म 10-11 चा विस्तार करण्याचे काम सुरू आहे. अभियांत्रिकी-विद्युतीकरणाशी संबंधित इंटरलॉकिंगची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेकडून पुढचे 9 दिवस मध्यरात्री विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक २३ मे ते १ जूनपर्यंत राहणार आहे. या काळात काही गाड्या रद्द तर गाड्या अन्य स्टेशनवरून सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

सीएसएमटी स्थानकाजवळ इंटरलॉकिंगच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. भायखळा ते सीएसएमटी उपनगरीय लोकल ट्रेन रात्री 12.30 ते पहाटे 4.30 या वेळेत बंद राहतील. मेगाब्लॉकमुळे शहराबाहेर जाणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होणार असून बाहेरून येणाऱ्या काही गाड्या दादर स्थानकापर्यंतच धावतील तर काही गाड्या दादरहून सुटतील. मडगाव-मुंबई मांडवी एक्स्प्रेस पनवेलपर्यंतच धावेल, तर मुंबई-मडगाव कोकण कन्या एक्स्प्रेस पनवेलहून सुटणार आहे, याची नोंद घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वेने केले.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने म्हटले आहे की, प्री-नॉन इंटरलॉकिंगचे काम सुलभ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्लॅटफॉर्मच्या विस्तारामुळे लांबच्या गाड्या जोडण्यास मदत होणार आहे. यामुळे सीएसएमटीमधील ट्रेनच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल. त्यामुळे 28 मे ते 2 जून दरम्यान मुंबई ते पुणे दरम्यानच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे.

23 मे ते 1 जून या 9 दिवसांच्या विशेष ब्लॉक काळात कोकणात फिरण्यासाठी आणि कोकणात गावाला जाणाऱ्या प्रवाशांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण, मध्य रेल्वेच्या विशेष ब्लॉगचा परिणाम कोकणात जाणाऱ्या गाड्यांवर होणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 20111 मुंबई ते मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस पनवेल स्थानकावरून सुटणार आहे. 12051 मुंबई ते मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस दादर स्थानकावरून सुटणार आहे. 22229 मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस दादरवरून सुटेल. 10103 मुंबई ते मडगाव मांडवी एक्स्प्रेस 1 आणि 2 जून रोजी पनवेलवरून सुटेल. 12133 मुंबई ते मंगलोर मंगलोर एक्स्प्रेस 1 आणि 2 जून रोजी पनवेलवरून सुटेल.

12052 मडगाव ते मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस 23 मे ते 1 जून या काळात दादर स्थानकापर्यंत धावेल. 12134 मंगलोर ते मुंबई मंगलोर एक्स्प्रेस दादर स्थानकापर्यंत धावेल. तर, हीच गाडी 31 मे व 1 जून रोजी पनवेल स्थानकापर्यंत धावेल. 10104 मडगाव ते मुंबई मांडवी एक्स्प्रेस पनवेल स्थानकापर्यंत धावेल. 22120 मडगाव ते मुंबई तेजस एक्सप्रेस दादरपर्यंत धावेल. 20112 मडगाव ते मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस 31 मे व 1 जून रोजी पनवेल स्थानकापर्यंत धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

या काळात काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय देखील मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाड्यांमध्ये, 22119 मुंबई ते मडगाव तेजस एक्सप्रेस 1 व 2 जून रोजी रद्द करण्यात आली आहे. 22120 मडगाव ते मुंबई तेजस एक्सप्रेस 1 व 2 जून रोजी रद्द करण्यात आली आहे. 22229 मुंबई ते मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस 1 व 2 जून रोजी रद्द करण्यात आली आहे. 22230 मडगाव ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस 1 व 2 जून रोजी रद्द करण्यात आली आहे.

या विशेष ब्लॉकसाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी-पुणे प्रगती एक्सप्रेस, पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस, नांदेड-सीएसएमटी तपोवन एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, लखनौ-सीएसएमटी पुष्पक एक्सप्रेस, अमृतसर-सीएसएमटी एक्सप्रेस, भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्सप्रेस, हावडा-सीएसएमटी, मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस, मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस, मंगलोर जंक्शन-सीएसएमटी एक्सप्रेस, हैदराबाद-सीएसएमटी हुसेन सागर एक्सप्रेस, होसा पीट जंक्शन- सीएसएमटी एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस, हावडा-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस या गाड्यांचा शेवटचा स्टॉप दादर असणार आहे. या गाड्या पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत जाणार नाहीत.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. अशावेळी अनेकजण फिरण्यासाठी तर अनेकजण आपल्या गावी जात असतात. यात अनेक प्रवासी गावी जाण्यासाठी बस किंवा ट्रेनचा पर्याय निवडतात. मध्य रेल्वेच्या या ब्लॉकमुळे प्रवाशांची काही काळ गैरसोय होण्याची शक्यता आहे. विशेषत: रात्री प्रवास करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे पुढचे 9 दिवस प्रवाशांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. हा ब्लॉक 23 मे मध्यरात्रीपासून 1 जूनच्या रात्रीपर्यंत असेल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

हेही वाचा - यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई फिरण्याचा प्लॅन करताय? ‘या’ अप्रतिम स्थळांना नक्की भेट द्या - Best Travel Places in Mumbai

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.