ETV Bharat / state

मावळ लोकसभा मतदार संघाच्या जागा वाटपावरून महायुतीतच तिढा, मावळच्या जागेसाठी सर्वच पक्ष आग्रही - खासदार श्रीरंग बारणे

पुणे जिल्ह्यातील मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे गेल्या 10 वर्षांपासून मावळमधून लोकसभेचे खासदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा सव्वा दोन लाख मतांच्या फरकानं दारुण पराभव केला होता. यंदा मावळच्या जागेसाठी महायुतीतील सर्वच पक्ष आग्रही असून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे.

Maval Lok Sabha constituency of Pune district
मावळ लोकसभा मतदार संघ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 22, 2024, 7:40 PM IST

मावळ (पुणे): मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघातून यंदादेखील तिसऱ्यांदा खासदारकीसाठी ते मैदानात उतरणार आहेत. मात्र यंदाची निवडणूक श्रीरंग बारणे यांच्यासाठी सोपी नाही. कारण महायुतीचे इतर पक्ष भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांनी मावळ लोकसभेच्या जागेवर उमेदवार देणार असल्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडं महाविकास आघाडीमध्येदेखील उमेदवारीवरून चढाओढ सुरू आहे. उद्धव ठाकरे गटानं मावळ लोकसभेवर दावा ठोकला आहेत. तर शरद पवार देखील मावळ लोकसभेच्या जागेसाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कोणता उमेदवार रिंगणात उतरणार आणि कोण बाजी मारणार? यावरून राजकीय गणिते ठरणार आहेत.

मावळ लोकसभा शिंदे गटाला गेली तर: मावळ लोकसभा ही जागा कट्टर शिवसेनेची मानली जाते. त्यामुळेच 2009 साली निर्माण झालेल्या या मावळ लोकसभेचे पहिले खासदार होण्याचा मान शिवसेनेचे दिवंगत नेते गजानन बाबर यांना मिळाला होता. खासदार श्रीरंग बारणे हे उद्धव ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणूक 2024 शिंदे गटाकडे ही जागा गेली तर तिसऱ्यांदा निवडणूक लढवण्यासाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तयारीला लागले आहेत. त्यांना मतदार संघाची आणि प्रश्नांची चांगली जाण आहे. मागच्या चार वर्षांत त्यांची लोकसभेतील उपस्थिती ९५ टक्के राहिली असून त्यांनी त्यांच्याकडील 100 टक्के निधी विकासासाठी खर्च केला आहे.

दिलेल्या उमेदवाराला जनता स्वीकारेल का? 2009 साली निर्माण झालेल्या मावळ मतदारसंघात 2024 साली चौथी लोकसभा निवडणूक पार पडणार आहे. मागील लोकसभेला शिवसेनेनं हॅट्रिक मारत मावळमध्ये भगव्याचा दबदबा दाखवून दिलाय. 2019 च्या लोकसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचं 'पानिपत' करून शिवसेनेचे श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा खासदार झाले आहेत. मागील निवडणुकीत चिंचवड, मावळ आणि घाटाखाली भाजपानं श्रीरंग बारणे यांच्यासाठी जोर लावला होता. यंदा मात्र त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झालाय. कारण, महायुतीत असणारे अजित पवार आणि भाजपादेखील मावळ लोकसभेसाठी उमेदवार देणार असल्याची चर्चा आहेत. महायुतीत उमेदवार दिल्यावर इतर पक्षाचा उमेदवार जनता मान्य करतील का? की बंड पुकारत वेगळी चूल मांडणार? हे पाहावं लागणार आहे.

तर मविआत तिढा : मावळ लोकसभा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेली तर नुकतेच राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे यांच्या गटात आलेले संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. ते अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जायचे. मात्र वर्षभरापूर्वी राज्यातल्या राजकारणात झालेले दोन मोठे भूकंप आणि जुन्या गोष्टींची मनात खदखद असल्यानं त्यांंनी अजित पवारांचा साथ सोडत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत संजोग वाघेरे राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी बारामतीचा आयात उमेदवार पार्थ पवार दिल्यानं ते नाराज झाले होते. यावेळी तर त्यांनी थेट पक्षच बदलला आहे. त्यामुळे आगामी मावळ लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. परंतु, संजोग वाघेरे यांचा विजय अवघड होणार आहे. कारण शरद पवार गटानं जर आयत्या वेळेला मावळ लोकसभेसाठी उमेदवार दिला तर महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण होणार आहे.

मावळ लोकसभा भाजपाकडे गेली तर : मावळ लोकसभा निवडणूक भाजपादेखील लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कारण भाजपाला एकेक खासदार महत्त्वाचा आहे. त्यामुळेच मावळ लोकसभेत भाजपाच्या उमेदवाराचे खासदार म्हणून अनेकदा पोस्टर बॅनर झळकले आहेत. मावळ लोकसभा लढविण्यासाठी भाजपाचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. मावळ परिसरात गावकी-भावकीचं मोठ्या प्रमाणात राजकारण होते. त्यामुळे भाजपाच्या बाळा भेगडे यांना याचा फायदा होऊ शकतो. खासदार बारणेंनी गेल्या दहा वर्षांत मतदार संघासाठी काय केलं? असा सवाल थेट मित्र पक्षांकडूच विचारला जातोय.

मावळ लोकसभा अजित पवार गटकडे गेली तर : सुरुवातीपासून अजित पवार हे मावळ लोकसभेसाठी आग्रही आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अजित पवार मावळ लोकसभेसाठी उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी अजित पवारांनी विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुलगा पार्थ पवारचा झालेला दारुण पराभव अजित पवारांच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळे यावेळेस अजित पवार हे पार्थ पवार यांना किंवा अजित पवार गटाच्या आयात उमेदवाराला संधी देण्याची शक्यता आहे.

मावळ मतदार संघ : मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा, खंडाळा, माथेरान, कर्नाळा पक्षी अभयारण्य अशी पर्यटन स्थळं, एकविरा देवी, महाडचा अष्टविनायक गणपती, चिंचवडचा मोरया गोसावी गणपती, देहूचे संत तुकाराम महाराज देवस्थान, शिरगावचे प्रति शिर्डी, देहूतील धम्मभूमी अशी धार्मिक स्थळं मावळमध्ये आहेत. यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केलेले लोहगड, राजमाची, कर्नाळा, विसापूर असे किल्ले आहेत. त्याचबरोबर कार्ला लेणी, भाजे लेणी, कोंढाणा लेणी, घोरावडेश्वर लेणी असा ऐतिहासिक ठेवा या मतदार संघाला लाभला आहे. या मतदार संघातील मतदार हा 60 टक्के ग्रामीण तर 40 टक्के शहरी तसेच निमशहरी भागात राहतो. मावळ लोकसभेत मतदारांची संख्या 25 लाखांहून अधिक पोहचलीय. चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप, पनवेलमध्ये भाजपाचे प्रशांत ठाकूर, उरणमध्ये अपक्ष निवडून आलेले आणि भाजपा संलग्न असणारे महेश बालदी यांचा अंतर्भाव होतो. याच मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पिंपरीतील अण्णा बनसोडे, मावळमध्ये सुनील शेळके आणि कर्जतमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे विधानसभेचे नेतृत्व करतात. उल्लेखनीय म्हणजे, येथे महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही.

मुख्य लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना होण्याची शक्यता: मावळ लोकसभा मतदार संघ हा मूळ शिवसेनेचा मानला जातो. मतदार संघ निर्माण झाल्यापासून मावळच्या जनतेनं इथं शिवसेनेचाच खासदार निवडून दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट म्हणजेच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढा होण्याची दाट शक्यता आहेत. कारण इतर उमेदवार रिंगणात उतरला तर त्याचा फायदा शिवसेनेच्या एका उमेदवाराला होईल. मग त्यामुळे उद्धव ठाकरे गट किंवा एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे.

मावळ मतदार संघातील प्रमुख समस्या : मृत्यूचा सापळा बनलेला पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग, खड्डेमय मुंबई-गोवा महामार्ग, मावळ बंद पाईप लाईन योजना, अतिक्रमण बांधकाम, रिंग रोड, आदिवासी नागरिकांच्या समस्या, रेल्वे स्टेशन्स अशा अनेक समस्या मावळ लोकसभा मतदार संघात आहेत. या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

हेही वाचा:

  1. काँग्रेस सोलापूर लोकसभेला युवा नेतृत्व प्रणिती शिंदेंना संधी देणार? भाजपानंही केली जय्यत तयारी
  2. मराठा आंदोलनात फूट; मनोज जरांगेंच्या आंदोलनामागं शरद पवार?; जरांगेंच्या आणखी एका सहकाऱ्याचा गंभीर आरोप
  3. भाजपानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय दिला प्रस्ताव? जाणून घ्या, इनसाईड स्टोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.