ETV Bharat / state

कोल्हापूरचा 'सांस्कृतिक ठेवा' आगीच्या भक्ष्यस्थानी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भीषण आग - Keshavrao Bhosale Theatre Fir

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 7:22 AM IST

Updated : Aug 9, 2024, 8:02 AM IST

Keshavrao Bhosale Theatre Fire : कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग कुस्ती मैदानावरील व्यासपीठाला भीषण आग लागली होती. यामुळं संपूर्ण नाट्यगृह जळून खाकं झालं. गुरुवारी रात्री 10 च्या सुमारस ही आग लागली. आगीचं नेमकं कारण अद्याप कळलं नाही.

Keshavrao Bhosale Theatre
केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक (ETV Bharat Reporter)

कोल्हापूर Fire In Keshavrao Bhosale Theatre : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी रोमच्या धर्तीवर साकारलेल्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान आणि शाहुकालीन पॅलेस थिएटर म्हणून ओळखलं जाणारं संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी (8 ऑगस्ट) संध्याकाळी भीषण आग लागली. ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करावं लागले. या आगीचं नेमकं कारण कळलं नसलं, तरी शॉर्टसर्किटनं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. यामुळं परिसरात आगीचे प्रचंड लोळ दिसून येत होते. कुस्ती मैदानाचं व्यासपीठ आणि थिएटर या आगीत भक्षस्थानी पडल्यानं मोठं नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली.

प्रेक्षकांकडून हळहळ व्यक्त : खासबाग कुस्ती मैदानाचं व्यासपीठ संपूर्णपणे लाकडाचं असल्यानं ही आग जोरात भडकली. या कुस्ती मैदानाला लागूनच केशवराव भोसले नाट्यगृह असल्यानं त्यालाही आग लागली. केशवराव भोसले नाट्यगृह आणि कुस्ती मैदानाला लागूनच खाऊ गल्ली असून इथं खवय्यांची मोठी गर्दी असते. त्यामुळं या परिसरात आग नियंत्रणात आणण्यासाठी तसंच आग पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. दरम्यान अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. भीषण आग पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी झाल्यानं अडथळे निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते.

केशवराव भोसले जयंतीनिमित्त दोन दिवस होते कार्यक्रम : संगीतसर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त 9 ते 10 ऑगस्ट या कालावधित राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जीवन कार्यावर आधारित या नाट्यगृहात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे यांनी दिली. तत्पूर्वीच या नाट्यगृहालाही आग लागल्यानं कोल्हापूरकर आणि रसिक प्रेक्षकांकडून हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे.

कलानगरी सुन्न : केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कलानगरी कोल्हापुरातील अनेक रंगकर्मींनी नाट्यगृहाकडं धाव घेतली. बऱ्या-वाईट घटनांचा जिवंत साक्षीदार असलेला आणि कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा डोळ्यादेखत भस्म होताना पाहून कलाकारांना अश्रू अनावर झाले. घटनास्थळी आमदार सतेज पाटील, महापालिका प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी भेट देऊन पाहणी केली.

हेही वाचा

  1. दादर येथील चित्रा सिनेमागृहाच्या कॅन्टीनला आग, जीवितहानी नाही - Fire To Canteen Of Chitra Cinema
  2. नागपुरातील गजबजलेल्या इतवारीत अत्तराच्या गोदामाला भीषण आग; एका तरुणीचा मृत्यू, तीन गंभीर - Nagpur Fire Accident
  3. बस-कारचा भीषण अपघात; आगीनं पेट घेतल्यानंतर कारमधील दोघांचा होरपळून मृत्यू - Nashik Car Bus Accident

Last Updated : Aug 9, 2024, 8:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.