ठाणे Dombivli Blast Fire : डोंबिवलीतील केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात मोठे धुराचे लोट उचं हवेत पसरल्यानं नागरिकांना मोठा त्रास होत आहे. डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील फेज टू परिसरातील केमिकल कंपनीला ही आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे.
केमिकल कंपनीत लागली मोठी आग : डोंबिवली इथल्या औद्योगिक वसाहतीमधील इंडस कपंनीत आज सकाळी मोठी आग लागली आहे. या आगीमुळे परिसारत मोठे धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील फेज टू परिसरात इंडस ही कंपनी आहे. विशेष म्हणजे यापूर्वी आग लागलेल्या कंपनीच्या शेजारील परिसरात ही कंपनी असल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
स्फोट होत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण : डोंबिवली औद्योगिक वसाहतीमधील इंडस या केमिकल कंपनीत आग लागल्यानं मोठी खळबळ उडाली. या आगीत केमिकल कंपनीत मोठे स्फोट होत असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे. घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. मात्र आग लागल्याचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कामगार आत अडकल्याची भीती : अमुदान कंपनी स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतील 30 कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. या कंपन्या अन्य भागात स्थलांतरित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात पुन्हा एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत आग लागल्यानं कंपनी मालक पुन्हा नागरिक, शासन, चौकशी यंत्रणांकडून लक्ष्य झाले. एमआयडीसीतील या सततच्या आगीच्या दुर्घटनांमुळे परिसरातील रहिवासी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान घटनास्थळी अद्यापही दुर्घटनाग्रस्त कंपनीच्या आतून स्फोटाचे आवाज होत असल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दहा गाड्या दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. या दुर्घटनेत अद्यापपर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र या कंपनीत काही कामगार घटना घडण्याअगोदर काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा :