ETV Bharat / state

काळ्या-पिवळ्या मारबतीची मिरवणूक; ऐतिहासिक बडग्या-मारबत उत्सव नेमका काय? - Badgya Marbat Festival - BADGYA MARBAT FESTIVAL

Nagpur Marbat Festival 2024 : विदर्भाचे वैभव असलेली आणि पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक महत्त्व असलेल्या बडग्या-मारबत मिरवणुकीला नागपूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

Marbat Festival 2024 unprecedented colors of historical badgya marbat festival in Nagpur
नागपूर बडग्या-मारबत उत्सव (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 7:51 PM IST

नागपूर Nagpur Marbat Festival 2024 : 144 वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या आणि धार्मिक सामाजिक महत्त्व असलेला बडग्या-मारबत महोत्सव आज (3 सप्टेंबर) नागपूरकरांच्या अभूतपूर्व अशा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय. यावेळी काळ्या आणि पिवळ्या मारबतची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तेव्हा नागरिकांमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. इतवारी परिसरातील नेहरू पुतळा चौकात काळी आणि पिवळ्या मारबतची गळाभेट झाली. हे दृश्य बघण्यासाठी नागपूरकर अक्षरशः वर्षभर वाट बघत असतात. बडग्या-मारबत जगातला एकमेव असा उत्सव आहे जो केवळ नागपुरात साजरा केला जातो. ही परंपरा गेल्या 144 वर्षांपासून अविरतपणे नागपुरकरांनी जोपासली आहे. पोळ्याच्या पाडव्याला बडग्या-मारबत उत्सवाचं आयोजन केलं जातं. यादरम्यान लाखोंच्या संख्येनं नागपूरकर या उत्सवात सहभागी झाले होते.

नागपूर बडग्या-मारबत उत्सव (ETV Bharat Reporter)

इडापिडा, रोगराई घेऊन जागे मारबत : समाजातील वाईट परंपरा, रोगराई, संकट यासह वाईट वृत्ती समाजातून नष्ट व्हावी यासाठी मारबतची मिरवणूक काढली जाते. गेल्या 144 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. या मिरवणुकीदरम्यान इडापिडा, रोग राई, जादूटोना घेऊन जा गे मारबत अशा घोषणा देण्यात आल्या.

मूळ परंपरा आदिवासी समाजाची : नागपुरात 1881 सालापासून ही परंपरा कायम आहे. तेली समाजाच्या बांधवांनी पिवळी मारबत तयार करून तिचं दहन करण्याची प्रथा सुरू केली. पोळ्याच्या पाडव्याला काठ्या, बांबू, तरट यापासून मोठे पुतळे बनवले जातात. त्यावर फाटके कपडे, चिंध्या गुंडाळून त्यांना विविध रंगांनी रंगवलं जातं. मारबत बरोबर जो बडग्या असतो त्याच्या गळ्यात मोडके झाडू, फाटके कपडे, फुटलेले डबे, टायरचे तुकडे यांच्या माळा घालतात. बडग्याच्या हातात मुसळ आणि कमरेला उखळ बांधलेले असते.

मारबत आणि बडग्या मिरवणुकीमागचा इतिहास : भोसले घराण्यातील बांकाबाई हिनं इंग्रजांशी हातमिळवणी केली होती. त्याचा निषेध म्हणून बांकाबाईचा कागद आणि बांबू वापरून तयार केलेल्या पुतळ्याची पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भव्य मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर मग तिचं दहन केलं जातं. यामध्ये काळी आणि पिवळी मारबत असे दोन प्रकार आहेत. बांकाबाईच्या नवऱ्यानं देखील तिच्या या कृत्याचा विरोध केला नाही. म्हणून त्याचाही पुतळा बनवून सोबतच त्याचीपण मिरवणूक काढतात. बांकाबाईच्या नवऱ्याच्या पुतळ्याला बडग्या असं म्हणतात. तसंच अनेकजण या उत्सवाला महाभारताचा देखील संदर्भ जोडतात.

काळी आणि पिवळ्या मारबतीचं महत्त्व : इंग्रजांची राजवट देशात असताना नागरिकांना एकत्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी ज्या पद्धतीनं पुण्यात गणेशोत्सव सुरू केला. त्याच पार्श्वभूमीवर नागपुरातदेखील देखील 'मारबत' उत्सव सुरू करण्यात आला होता. 'मारबत' उत्सवाकडं गणेशोत्सवापेक्षा जुना उत्सव म्हणून पाहिलं जातं. प्राचीन काळात अनेक रुढी परंपरा होत्या. त्या मानव जातीसाठी घातक ठरत असल्यानं त्या रुढी परंपरांचं उच्चाटन व्हावं, म्हणून देखील हा उत्सव साजरा केला जातो. 'मारबत' उत्सव साजरा करण्यामागं एक उद्धिष्ट आहे. ते म्हणजे, वाईट रुढी परंपरा आणि अंधश्रद्धेचं दहन करून चांगल्या परंपरा आणि विचारांचं स्वागत करणं.

हेही वाचा -

  1. 144 वर्ष जुन्या ऐतिहासिक 'मारबत' उत्सवाला सुरुवात, जाणून घ्या काळ्या- पिवळ्या मारबतीचं महत्त्व - Nagpur Marbat Festival 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.