पुणे Maratha Survey : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे राज्यात मराठा समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे. (Method of Maratha Survey) राज्यात होत असलेल्या या सर्व्हेक्षणातून मराठा समाजाचं मागासलेपणा सिद्ध करण्यात येणार आहे. (Manoj Jarange Patil) अशातच पुण्यात महापालिकेच्या माध्यमातून क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर सुरू असलेल्या सर्व्हेक्षणाची माहिती ईटिव्ही भारतने घेतली. असून यात मराठा समाजाच्या बरोबरच खुल्या प्रवर्गातील सर्वच जातींचं सर्व्हेक्षण केलं जातं असल्याची माहिती समोर येत आहे. (Maratha Reservation)
'डोर टू डोअर' जाऊन सर्व्हेक्षण: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यभर 23 जानेवारी ते 31 जानेवारी या आठ दिवसांच्या काळात मराठा आणि खुल्या प्रवर्गातील लोकांच्या घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे आणि सर्व्हेक्षण ॲपमध्ये कशी माहिती गोळा करावी याबाबत ट्रेनिंग देखील देण्यात आलं आहे. असं असताना पहिल्या दिवशी ॲपच्या सर्व्हर डाऊनमुळे सर्व्हेक्षणाला अडचणी आल्या; पण आता पुण्यात क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर 'डोर टू डोअर' जाऊन सर्व्हेक्षण केलं जातं आहे.
मराठा आरक्षणासाठी 147 प्रश्नांची प्रश्नावली: याबाबत महापालिकेचे सहाय्यक आयुक्त रवी कंधारे यांनी सांगितलं की, पुण्यात महापालिकेच्या माध्यमातून हे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पुण्यातील घोले रोड क्षेत्रीय कार्यालय हे 16 स्क्वेअर मीटरच्या हद्दीमध्ये आहे. या सर्वेक्षणासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. त्या कामासाठी एकूण 85 प्रघलकांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सहा पर्यवेक्षक तसेच दोन मास्टर ट्रेनर अशी नेमणूक या सर्व्हेक्षणाच्या कामासाठी करण्यात आली आहे. आम्हाला 31 जानेवारी पर्यंत सर्व्हेक्षण करायचं आहे. मराठा आरक्षणासाठी यामध्ये एकूण 147 प्रश्नांची प्रश्नावली आहे. दोन दिवसात जवळपास 15 ते 20% काम पूर्ण झाले आहे. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये एकूण 18 आरोग्य कोठे आहेत. त्यांच्या माध्यमातूनच आम्ही हे काम करत आहोत. त्या त्या भागातील कोठीनुसार तिथले प्रघनक नेमले आहेत तसेच त्यांना घरे दाखवून त्यांचा त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी सांगितले आहे. या सर्वांना आयोगामार्फत 21 तारखेलाच प्रशिक्षण देण्यात आले आहे, असं यावेळी कंधारे यांनी सांगितलं.
अशी आहे प्रश्नावली? सर्व्हेक्षणसाठी जे ॲप बनविण्यात आली आहे. त्यामध्ये मॉड्यूल 'ए'मध्ये कुटुंबाची मूलभूत माहिती, नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का, नसाल तर तुमची जात कोणती असे एकूण 14 प्रश्न विचारले जात आहे. तर मॉड्यूल 'बी'मध्ये तुम्ही कोणत्या घरात राहता? तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त आहे? तुमच्या जातीचा पारंपरिक व्यवसाय कोणता? सध्या तुम्ही काय करता? तुमच्या कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का? असे एकूण 20 प्रश्न असतील आणि मॉड्यूल 'सी'मध्ये कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काय आहे याची माहिती आणि असे एकूण 76 प्रश्न विचारले जात आहे. मॉड्यूल 'डी'मध्ये समाजाचं मागासलेपण बरोबर 33 प्रश्न हे विचारले जात आहे. मॉड्यूल ‘ई’मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत एकूण अकरा प्रश्न विचारले जातील. तर असे एकूण 154 प्रश्न सर्व्हेक्षण करण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडून विचारले जात आहे. जर मराठा नसेल आणि खुल्या प्रवर्गातील असेल तर कमी प्रश्न विचारून त्या त्या खुल्या प्रवर्गातील जातीचं देखील सर्व्हेक्षण केलं जातं आहे.
काही ठिकाणी प्रतिसाद, काहींचा नकार: पुण्यातील शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वेक्षण करणाऱ्यांशी संवाद साधला असता, ''आम्हाला दिलेल्या हद्दीत आम्ही सर्व्हेक्षण करत आहोत. फक्त मराठा समाज नव्हे तर खुल्या प्रवर्गातील सर्वच समाजाचं सर्व्हेक्षण हे केलं जात आहे. सर्वेक्षण करत असताना नागरिकांकडून प्रतिसाद चांगलाच मिळतो असं नाही. काही जणांकडून ही माहिती देण्यास नकार दिला जात आहे तर काहीजण याला चांगला प्रतिसाद देत असल्याचं'' त्यांनी सांगितलं.
हेही वाचा: