ETV Bharat / state

'भगवं वादळ' आज धडकणार नवी मुंबईत; तगडा पोलीस बंदोबस्त, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कसं आहे नियोजन ?

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी इथून मुंबईपर्यंत पदयात्रा काढलीय. ही यात्रा आज नवी मुंबईत प्रवेश करणार आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे.

Maratha Reservation
Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 7:08 AM IST

नवी मुंबई Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी काढलेला पायी मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत धडकणार आहे. तत्पूर्वी 25 तारखेला या आंदोलनात सहभागी होणाऱ्या मराठी बांधवांचा शेवटचा मुक्काम नवी मुंबईत असणार आहे. यामुळं नवी मुंबई शहरात अडीच ते तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केलाय. त्याचबरोबर पनवेलच्या हद्दीत आणि एपीएमसी मार्केटमध्ये आंदोलकांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.

पनवेल परिसरात दुपारच्या जेवणाची सोय : मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखोंचा जनसमुदाय नवी मुंबईमध्ये येत आहे. त्यामुळं रायगडमधील पनवेल शहरातील नागरिकांनी जय्यत तयारी केली असून, जेवणाची व्यवस्था केलीय. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलकांना 40 किलोमीटरपर्यंत खारघर ते कळंबोली, नवीन पनवेल, रसायनीपर्यंत जेवणाचं वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी जोरदारपणे तयारी सुरू असून सुमारे 10 लाख व्यक्तींचं जेवण तयार केलंय. प्रत्येकाला 2 भाकरी भाजी एक पाण्याची बॉटल देण्यात येणार आहे. पनवेल परिसरातील प्रत्येक घरातून दहा दहा भाकरी, पोळ्या दिल्या असून भाजीची सोय देखील करण्यात येत आहे. पदयात्रेतील आंदोलकांचं दुपारचं जेवण पनवेलमध्ये होणार आहे. संध्याकाळच्या सुमारास एपीएमसीमधील पाचही मार्केटमध्ये जेवण आणि राहण्याची सोय करण्यात आलीय.

अडीच ते तीन हजार पोलीस तैनात : पनवेल परिसरात मराठा आंदोलकांचं दुपारचं जेवण असून पनवेल ते वाशीपर्यंत तब्बल अडीच ते तीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणं एपीएमसी मार्केटमध्ये ज्या ठिकाणी आंदोलक राहणार आहेत, त्या ठिकाणी देखील मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त राहणार असल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितलंय.

आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची लढाई आता तीव्र झाली आहे. मराठा समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही. तसंच मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असून, वेळ पडली तर मराठा आरक्षणासाठी वेगळा कायदा करू, पण मराठा आरक्षण देऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिलं होतं.

हेही वाचा :

  1. पुण्यात मनोज जरांगे यांच्या पायी मोर्चाला तुफान गर्दी, आरक्षणासाठी जरांगे यांची मुंबईकडं कूच
  2. आरक्षणाची मागणी कायद्याला धरूनच, मुंबईतून आरक्षण घेऊनच येणार - मनोज जरांगे पाटील

जरांगेंच्या पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत चोख बंदोबस्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.