ETV Bharat / state

तोडगा निघाला याचा आनंद; ओबीसींवर अन्याय होणार नाही असाच तोडगा - देवेंद्र फडणवीस - राजकारण

Maratha Reservation Issue : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला याचा आनंद आहे. (Deputy CM Devendra Fadnavis) ओबीसींवर अन्याय होणार नाही असाच तोडगा राज्य सरकारने काढला आहे, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात मांडलं. याबाबत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदनही केलं.

Maratha Reservation Issue
फडणवीस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 7:33 PM IST

देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना

नागपूर Maratha Reservation Issue : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात आज अतिशय चांगला मार्ग निघाला. आंदोलनाची सांगता झाली याचा मला आनंद आहे. (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी हा मार्ग स्वीकारला, यासाठी आभार मानतो. कायद्याच्या आणि संविधानाच्या कक्षेतच आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल हे आम्ही प्रारंभीपासून सांगत होतो, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. ते नागपुरात बोलत होते.

ओबीसी समाजाची भीती दूर झाली : आंदोलनाबाबत मुख्यमंत्री आणि सरकार कायमचं सकारात्मकच होते. या नव्या पद्धतीमुळे मराठा समाजाचा मोठा प्रश्न सुटणार आहे. ओबीसी बांधवांच्या मनात भीती होती, तसा कुठलाही अन्याय यामुळे होणार नाही. ओबीसींवर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकारनं घेतला नाही, हे मी छगन भुजबळ यांना स्पष्ट करू इच्छितो. ज्यांच्या नोंदी नाहीत किंवा पुरावे नाहीत त्यांना प्रमाणपत्र देण्याचा विषय नव्हता. पण, ज्यांच्या नोंदी आहेत आणि कायदेशीर अधिकार असताना प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या, त्यांना ते मिळण्याचा मार्ग यातून मोकळा केला आहे. त्याची पद्धत सोपी केली आहे. राज्यातील सगळ्या समाजाला न्याय मिळवून देण्यात आला आहे.

गंभीर गुन्हे मागे घेण्याची मागणी नाही : ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, ही आमची पहिल्या दिवसापासून भूमिका होती. मराठा आरक्षणाबाबत सर्वेक्षण सुरूच राहील. दरम्यानच्या काळात क्युरेटिव्ह याचिकासुद्धा लागली आहे. त्यातच यश मिळावे, हा आमचा प्रयत्न आहे. पण, त्यात यश मिळाले नाही तर सर्वेक्षण कामी येणारच आहे. सुप्रीम कोर्टाने काढलेल्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. अंतरवाली सराटी किंवा अन्य ठिकाणचे मराठा आंदोलकांविरुद्ध गुन्हे आम्ही मागे घेतले आहेत. पण, ज्यांनी घरे जाळली, सरकारी मालमत्तेचे नुकसान केले, असे गुन्हे मागे घेण्याची कुणाचीही मागणी नाही आणि त्यावर निर्णय घेतलेला नाही. कारण अशा गुन्ह्यांबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत, असंही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हेही वाचा:

  1. जरांगेंच्या मागण्यांवर सरकारनं काढली अधिसूचना, काय आहे अधिसूचनेत; मध्यरात्री काय घडलं?
  2. मराठा आरक्षणाचा तिढा सुटला; मुंबई डबेवाल्यांनी मानले सरकारचे आभार
  3. मराठा आरक्षणाच्या घोषणेनंतर राज ठाकरेंचा सरकारला टोला, वाचा जरांगे पाटलांना उद्देशून काय म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.