ETV Bharat / state

Manoj Jarange Patil : तर सरकारवर पश्चातापाची वेळ आणेल, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 18, 2024, 5:42 PM IST

Manoj Jarange Patil : सगे सोयऱ्याबाबत निर्णय न घेतल्यास राज्य सरकारला पश्चातापाची वेळ आणली नाही तर नाव बदलून ठेवीन, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये दिला आहे. राजकारण माझा मार्ग नाही मी निवडणूक लढणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (Sage Soyre)

Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील सरकारला इशारा देताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Manoj Jarange Patil : मराठा चळवळीतून न्याय देणार असून पुढील दिशा ठरवण्यासाठी 24 मार्च रोजी अंतरवाली येथे महत्त्वाची बैठक आहे. तिथे भव्य मंडपात अंतिम बैठक आणि ठोस बैठक असेल असं जरांगे पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे सरकार समोर नवा पेच निर्माण करणार असल्याचा इशारा यावेळी दिल्याचं बोललं जात आहे.

प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान : जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असं मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर बोलताना मी त्यांच्या शब्दाचा सन्मान करतो. ते नेहमी जे बोलतात ते स्पष्ट बोलतात; मात्र राजकारण माझा मार्ग नाही. सामाजिक चळवळीतून न्याय मिळवणे हाच माझा मार्ग आहे. सामाजिक चळवळीतून सत्तेत आणि राजकारणात नसताना ज्या गोष्टी मिळणार नाही त्या मिळाल्या. सरकारने आमची वारंवार फसवणूक केली. आरक्षण आज देतो, उद्या देतो म्हणून आमची फसवणूक केली. आचारसंहिता लागण्यापूर्वी झालेल्या बैठकीत सगेसोयरे (Sage Soyre) बाबत निर्णय जाहीर करू असं म्हणाले. मात्र त्याची घोषणा नसल्यानं आमची पुन्हा फसवणूक झाल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय.

महत्त्वाची बैठक घेऊन निर्णय : 24 तारखेला आम्ही राज्यातील मराठा समाजाची बैठक अंतरवाली येथे घेणार असून या बैठकीत आम्ही आमची पुढची दिशा ठरवणार आहे. या बैठकीला राज्यातील सर्व तज्ञ हजर राहणार आहेत. इथे प्रचंड मोठी बैठक असणार आणि निर्णायक बैठक असणार आहे. आचारसंहिता लागण्याच्या अगोदर मराठा आरक्षणावर निर्णय घेणार होते; मात्र घेतला नाही, अशी खंत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली.

तर आम्ही सरकारला कायद्याने खेटणार : 24 तारखेला अंतिम बैठक आणि निर्णय मराठा समाजाचा असणार आहे. एक मताने ठोस निर्णय घ्यायचा आहे. सरकार कायद्याने खेटत असेल तर आम्ही देखील आता सरकारला कायद्याने खेटणार आहोत आणि यावर 24 तारखेला निर्णय होईल. 900 एकरमध्ये आमची सभा होणार आहे. ती कुठे घ्यायची त्याचाही निर्णय या बैठकीत घेऊ. ठोस निर्णय झाल्याच्या नंतर सरकारला कळणार आहे की, आपण सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी केली असती तर बरं झालं असतं, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी मांडलं.

हेही वाचा:

  1. Sanjay Raut News: आर आर पाटील यांच्याप्रमाणं धाडस दाखवून ऑनलाईन गेमिंग ...संजय राऊत यांची राज्य सरकारकडं मागणी
  2. Pandharpur Temple News: बुलेट प्रुफ काचेमध्ये पंढरीचा विठ्ठल उभा राहिला! मुर्तीचं संरक्षण करण्याकरिता काम सुरू
  3. लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगानं बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पदावरुन हटवलं, नेमकं काय आहे प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.