ETV Bharat / state

रामाचं राज्य असतं तर, मराठ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती; संजय राऊतांचा टोला - Maratha Reservation

Sanjay Raut On Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार शासनानं नवीन अधिसूचना जारी केलीय. अधिसूचनेतील ‘सगेसोयर’ या शब्दामुळं मराठा समाजाला कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळणार आहे. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. मनोज जरांगे पाटील यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदरा संजय राऊत यांनी दिलीय.

Sanjay Raut On Maratha Reservation
Sanjay Raut On Maratha Reservation
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 6:25 PM IST

संजय राऊत यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Sanjay Raut on Maratha Reservation : मराठा समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलंय. सरकारच्या अधिसूचनेनं आता 'सगेसोयरे' या शब्दांसह मराठा समाजातील सदस्यांना ओबीसीतून लाभ मिळणार आहे. मराठा आंदोलनाला यश आल्यानंच लाखो मराठा बांधवांनी सरकारचा निर्णय स्वीकारून जल्लोष केल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

जरांगेंवर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये : नवी मुंबईतील वाशीत मुख्यमंत्री एकनाथ यांनी मनोज जरांगे यांना नवी अधिसूचना दिलीय. आता ही अधिसूचना सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. आता या अधिसूचनेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनीही सरकारच्या अधिसूचनेवर बोलताना 'पुन्हा त्याच मुद्द्यामुळं जरांगेंवर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये', अशी प्रतिक्रिया दिली.

अध्यादेश नसून अधिसूचना : मराठा समाजाला दिलेला अध्यादेश नसून, एक अधिसूचना आहे. येणाऱ्या 16 फेब्रुवारीपर्यंत यावर सरकारनं हरकती मागवल्या आहेत. राज्यातील विचारवंत, वकिलांनी याचा अभ्यास करून लाखोंच्या संख्येनं हरकती पाठवाव्यात. त्यामुळं दुसरी बाजूही सरकारच्या लक्षात येईल, अशी विनंतीही सरकारकडून करण्यात आलीय.

आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला असेल तर आनंद : मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाला होता, म्हणून जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या लाखो तरुणांना सोबत घेऊन पुढं निघाले. राजकारणाच्या पलीकडं जाऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची आमची भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे खासदर संजय राऊत यांनी दिली. सरकारनं मराठा, धनगर, ओबीसींसाठीही मार्ग काढावा. हे आंदोलन कोणत्या मुद्द्यावरून मागं घेण्यात आलं हे कळायला हवं. सरकारनं जारी केलेल्या आदेशानुसार खरंच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार का? येणाऱ्या काही दिवसात कळेल. अधिसूचना काढल्यानंतरही सरकारनं मनोज जरांगे यांच्यावर पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आणू नये, अशी आमची इच्छा आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता हा प्रश्न सोडवला पाहिजे. हा प्रश्न सुटला तर आनंदच होईल, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलाय.

देशात पलटी रामाचे सरकार : देशात पलटी रामाचे सरकार असल्याचा आरोप राऊत यांनी केलाय. सध्या देशात रामराज्य असल्याचं सांगितलं जातं. मात्र, देशातील परिस्थिती पाहता हे पलटी रामाचं राज्य आहे. रामाचे राज्य असतं, तर मराठ्यांना आंदोलन करावं लागलं नसतं. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. अजित पवार, प्रफुल पटेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असताना भाजपानं त्यांना सरकारमध्ये समाविष्ट केलं नसतं. त्यामुळं हे रामाचे नाही, तर पलटी रामाचे राज्य असल्याचा आरोप संजय राऊत यांनी भाजपावर केलाय.

यापेक्षा रावणाचे राज्य चांगले : राम राज्य म्हणतात, मात्र यापेक्षा रावणाचं राज्य अधिक चांगलं होतं. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे. त्यामध्ये आरक्षणाचा असा प्रश्न कधीच निर्माण झाला नव्हता. सरकारची धोरणं योग्य नाहीत. महाराष्ट्रातला रोजगार बाहेर जात आहे, यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एका शब्दानंही बोलत नाहीत, यांना कोणाची भीती आहे. महाराष्ट्र विकला जातोय, महाराष्ट्राचा रोजगार पळवला जातोय. राज्यांच्या प्रश्नावर त्यांनी बोललं पाहिजे, असंही राऊत म्हणाले.

पत्रकारांवर हल्ले : पोलीस खात्यामध्ये राजकीय भरती, बदली होत आहेत. स्वतंत्र यंत्रणा आहे, मात्र गेल्या पाच, सहा वर्षात आमचा काळ सोडला तर एका विचारांच्या लोकांना महत्त्वाच्या पदावर ठेवलं जातं. प्रशासनातील मोठ्या पदावर बसलेल्या लोकांना अयोध्येत आपल्या भावना व्यक्त कराव्या वाटतात. हा पुरोगामी देश आहे. आम्ही स्वतः प्रभू श्रीराम आंदोलनात आघाडीवर होतो, मात्र संयम पाळावा लागतो. पत्रकारांना हल्ल्याला सामोरे जावे लागत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलंय. त्याचाच प्रत्यय पुण्यामध्ये आला आहे. वृत्तपत्रांची गळचेपी नॉर्थ कोरिया या देशात होते. वृत्तपत्र, समाज माध्यम, मीडिया यांच्यावर पूर्णतः बंदी आलेली आहे, अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशात येणार असून त्याला आपण सगळे जबाबदार आहोत, असा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

ममता आणि 'आप'सोबतच : राहुल गांधींना पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांना आसाममध्ये सरकार विरोध करतं. तरी देखील 'भारत जोडो न्याय यात्रा' थांबली नाही. जनता भारत जोडो न्याय यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाली आहे. 2024 निवडणुका भाजपासाठी सोप्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळं भाजपा पक्ष सोडून आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. आमच्या प्रमुख लोकांची बैठक मुंबईमध्ये झाली, नक्की काय चाललं हे आम्हाला पत्रकारांपेक्षा जास्त माहीत असतं. दिल्लीत 'आप', काँग्रेस एकत्र निवडणूक लढविण्याबाबत चर्चा झाली आहे. पंजाबमध्ये त्यांची चर्चा सुरू आहे. विद्यमान खासदारांना जागा देण्याची चर्चा सुरू आहे, असं राऊत यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा -

  1. मराठा आरक्षणाबाबतच्या अधिसूचनेविरोधात न्यायालयात जाणार; गुणरत्न सदावर्तेंची भूमिका
  2. मराठ्यांचा ऐतिहासिक विजय! आरक्षणाची अंमलबजावणी होईपर्यंत सर्वांना ओबीसींच्या सुविधा मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
  3. मराठा आंदोलनाला मोठं यश, मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबीयांनी मानले सरकारचे आभार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.