ETV Bharat / state

प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर मनोज जरांगे म्हणाले 'आता आम्हाला सत्तेत जायचंय'; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होणार? - Manoj Jarange Patil - MANOJ JARANGE PATIL

Manoj Jarange Patil : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची मंगळवारी उशिरा रात्री भेट घेतलीय. भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर आरक्षणासाठी आंदोलन करणारे जरांगे म्हणाले 'आता आम्हाला सत्तेत जायचंय'; लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय भूकंप होणार?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 27, 2024, 11:18 AM IST

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील

जालना Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी रात्री उशिरा भेट घेतली. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून त्या अनुषंगानं प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा केलीय. आज प्रकाश आंबेडकर हे पत्रकार परिषद घेणार आहेत. तर भेटीत काय चर्चा झाली, याबाबत मी 30 तारखेला बोलणार असल्याचं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलंय. ते अंतरवाली सराटीत प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलत होते.

आम्हाला आता सत्तेत यायचं : यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "हे सरकार नुसता वेळ काढूपणा करत आहे. विशेष बाब म्हणजे सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच नाही. त्यामुळं आता आम्हाला यांच्याकडून घ्यायचं नाही तर आम्हाला आता देणारं व्हायचं आहे. त्यामुळं आम्हाला आता सत्तेत यायचं आहे. आपल्या लोकांना आपणच निवडून देऊन न्याय घ्यायचा आहे. त्यासाठी मी येत्या 30 तारखेला योग्य तो निर्णय घेणार आहे." पुढे जरांगे पाटील म्हणाले, " त्यांनी कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतीमालांना भाव नाही. त्यात कापूस, तूर, सोयाबीन, मका या प्रमुख पिकांना भाव नाही. आता शेतकऱ्यांच्या शेतातला घरातला कापूस संपला. त्यानंतर कापसाचे भाव वाढवले. हा कुठला न्याय? त्याकरता आता न्याय देणारं व्हायचं आहे. आपल्याला आता सत्तेत जायचं आहे, असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले.

लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा : वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना प्रश्न विचारले असते असता त्यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा झाल्याचं सांगितलं. पुढे आंबेडकर म्हणाले, " यासंदर्भात वेळ आल्यावरच मी लवकरच सांगणार आहे. तसंच जरांगे पाटील आणि आमची भेट ही सकारात्मक झाली. लवकरच काहीतरी चांगलं राज्यात घडेल," असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. दरम्यान जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या या भेटीनंतर राज्यात एक मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळतेय.

हेही वाचा :

  1. आंदोलकांनी पाठ फिरवल्यानं मनोज जरांगेंचा संताप; गावागावातून अपक्ष उमेदवार देण्याचा निर्णय बारगळणार? - Maratha Reservation Protest
  2. Manoj Jarange Patil : तर सरकारवर पश्चातापाची वेळ आणेल, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.