ETV Bharat / state

"देवेंद्र फडणवीस यांचं मला गुंतवायचं स्वप्न..."- मनोज जरांगे - MANOJ JARANGE PATIL NEWS - MANOJ JARANGE PATIL NEWS

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 'नॉन बेलेबल वॉरंट' पारित करण्यात आला होता. याबाबत ते आज (2 ऑगस्ट) पुणे न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयातून बाहेर आल्यावर त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Manoj Jarange Patil
देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 7:02 PM IST

पुणे Manoj Jarange Patil : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मला गुंतवायचं स्वप्न आहे. ते स्वप्न मी पूर्ण होऊ देणार नाही," असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

जरांगे पाटील पुणे न्यायालयात : 2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 'नॉन बेलेबल वॉरंट' जरांगे पाटील यांच्या विरोधात जारी केला होता. आज झालेल्या सुनावणी बाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "आज उपोषणामुळे मला प्रचंड त्रास होत आहे. यामुळे आज मी न्यायालयात रुग्णवाहिकेत आलो आहे. मला कायद्याचा, संविधानाचा तसेच न्यायाधीशांचा सन्मान आहे. त्यामुळे मी आज रुग्णवाहिकेतून न्यायालयात हजर राहिलो आहे. मी न्यायालयाचा आदर करतो आणि करत राहणार आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत मी आता काहीच बोलणार नाही."

मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना (ETV Bharat Reporter)

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच- पाटील : एकीकडे आपण रुग्णवाहिकेतून उपचार घेत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र दौरा आणि पुढील विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "माझ्या तब्येतीला किंमत नसून समाजातील तरुणांना किंमत आहे. मी समाजासाठी रुग्णवाहिकेतून जाणार की, कशातून जाणार? याला महत्त्व नाही. माझा महाराष्ट्र दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पूर्ण होणार आहे. माझ्या शरीराची परिस्थिती काहीही असली तरी मी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्याशिवाय शांत राहणार नाही. सरकारचा कितीही विरोध असो, मी देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही," असं यावेळी पाटील म्हणाले.

ओबीसी आमचे शत्रू नाही : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्यभर दौरा करत आहेत. त्याबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर यांना आम्ही मानतो आणि मानत राहणार आहोत. त्यांनी काय टीका करावी, काय करू नये हा त्यांचा अधिकार आहे. ते आमच्या बाजूने लढतील याची, आम्हाला आशा आहे. ओबीसी आमचे शत्रू नाही आणि मी असं कधीचं म्हटलेलं नाही. ग्रामीण भागातील एकही दलित, आदिवासी लोकांना बोललेलो नाही. ओबीसी नेते छगन भुजबळ हेच ओबीसी यांची वाट लावत आहेत."

तिसऱ्या आघाडीची गरज नाही : आगामी विधानसभेच्या तिसऱ्या आघाडीबाबत मनोज जरांगे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, "तिसऱ्या आघाडीची गरज नाही. समाजाला न्याय द्यायचा आहे. गरिबांची लढाई लढायची आहे." मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या बॅनरबाबत ते म्हणाले की, "एखाद्या उत्साही कार्यकर्त्यानं केलं असेल. मला उभं राहायचं नाही. आम्ही गोरगरिबांना सत्तेत आणणार आहोत."

हेही वाचा :

  1. फसवणूक प्रकरणी मनोज जरांगेंना दिलासा; अटक वॉरंट न्यायालयाकडून रद्द, 3 सप्टेंबरला होणार पुढील सुनावणी - Manoj Jarange Gets Relief
  2. विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा डॅमेज केली जातंय का? सत्ताधारी-विरोधी पक्षांचे 'हे' आहेत दावे - Maharashtra Politics
  3. "सरकार गुंडांच्या टोळ्या चालवतंय, त्याचे प्रमुख दिल्लीत बसलेत"; संजय राऊतांचा प्रहार - Sanjay Raut

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.