ETV Bharat / state

"मुंबईत येऊन...", मनोज जरांगे पाटलांचा राज ठाकरेंना इशारा - Manoj Jarange Patil

Manoj Jarange on Raj Thackeray : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे शुक्रवारपासून (9 ऑगस्ट) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज (10 ऑगस्ट) दौऱ्याच्या सांगताप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना जरांगे पाटलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.

Manoj Jarange Patil Criticized MNS chief Raj Thackeray over Maratha Reservation in Kolhapur
मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 6:34 PM IST

कोल्हापूर Manoj Jarange on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज नसल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या विधानानंतर मराठा आंदोलकांनी आक्रमक होत धाराशिवमध्ये राज ठाकरे थांबलेल्या हॉटेलमध्ये जात त्यांना जाब विचारला. यावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडत राज ठाकरे यांनी आपण मनोज जरांगे पाटील यांना भेटून बोलणार असल्याचं आश्वासन मराठा आंदोलकांना दिलं. आता मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंच्या त्या विधानावर प्रतिक्रिया देत हल्लाबोल केलाय.

मनोज जरांगे पाटील कोल्हापूर पत्रकार परिषद (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील : कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले, "सध्या राज ठाकरेंचा राज्यात दौरा सुरू आहे. त्यामुळं त्यांना कुणीही अडवू नये. सध्या आपलं आंदोलन राज्यभर सुरू नाही. ज्यावेळी अडवायचं असेल त्यावेळी मुंबईत येऊन त्यांना जाब विचारू, एवढी आपली ताकद आहे". तसंच माझ्यावरील लोकांचं प्रेम कमी होऊ शकत नाही. हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी असून 10 लोक असले तरी मी मागं हटणार नाही. जे आम्हाला सहकार्य करणार नाहीत त्यांना आम्ही पाडू, असंही जरांगे पाटील म्हणाले.

पुढं ते म्हणाले, "ओबीसीच्या मोठ्या जातींनी ओबीसीतील छोट्या जातींचा असा किती फायदा केलाय की आमच्यामुळं त्यांना तोटा होईल? हे लोक सत्तेत असून आम्हाला सापळा रचून फोडत आहेत. आमचे लोक फोडून पत्रकार परिषद घ्यायला लावतात. ओबीसी नेत्यांकडून आकडा वाढवून सांगितला जातोय. गोरगरीब ओबीसी समाजात संभ्रम निर्माण केला जातोय." तसंच मला सगळ्या नेत्यांशी जोडलं जातंय, पण मी माझाच आहे, असंही जरांगे पाटलांनी यावेळी स्पष्ट सांगितलं. देशातील हे पहिलं आंदोलन असेल जे वर्षभर चालू आहे. सगेसोयरे आणि रक्तसंबंध हे एकच नाहीत. सगेसोयरे म्हणून आरक्षण टिकणार नाही म्हणता तर बैठक कशाला घेता? कशाला ओबीसी समाजाच्या नेत्याला बोलायला लावता? कोल्हापुरातील एक नेता पुण्यात जाऊन सगेसोयरेबद्दल बोलतो. आमच्या बाजूनं एकही पक्ष नाही, पण स्वत:च आम्ही आमच्या बाजूनं असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांवर बहिष्कार टाका - रामदास आठवले - Ramdas Athawale Vs MNS
  2. माझी पोरं गाल, तोंड लाल करतील, तेव्हा कळेल- राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना इशारा - Raj Thackeray Slams Manoj Jarange
  3. मराठा आंदोलकांचा राडा, राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; पाहा व्हिडिओ - Raj Thackeray Vs Maratha Protestors

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.