मुंबई BIGG BOSS OTT : 'बिग बॉस' हा भारतातील एक अतिशय प्रसिद्ध रिॲलिटी शो आहे. महिन्याभरापूर्वी 'बिग बॉस ओटीटी 3' हा कार्यक्रम ओटीटीवर सुरू झाला आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. मात्र, त्यात दाखवण्यात आलेल्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हिडिओमध्ये अरमान मलिक आणि त्याची पत्नी कृतिका मलिक यांचे अश्लील चाळे दाखवण्यात आले होते. यामुळं मनीषा कायंदे यांनी बिग बॉस शोचं चित्रीकरण थांबवावे अशी मागणी केली आहे.
'बिग बॉस' शोचं चित्रीकरण थांबवावे : हिंदी 'बिग बॉस'चे शूटिंग चालू आहे. या 'रिॲलिटी शो'मध्ये अत्यंत अश्लील असं चित्रीकरण त्यांनी दाखवलं आहे. शोमध्ये त्यांनी सगळ्या लिमिट पार केल्या आहेत. म्हणजे तो 'रिॲलिटी शो' आहे आपल्याला माहित आहे. ते कलाकार तिकडे काय करतात. हे सगळं त्यांचं जीवन तिकडे दाखवलं जातं. परंतु जे दोन कलाकारांचे अत्यंत अश्लील कृत्य दाखवलं आहे. त्यामुळं या शोचं चित्रीकरण थांबवावे, असं निवेदन शिवसेनाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिलं आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्मला सेन्सॉरशिप पाहिजे : पुढे बोलताना मनिषा कांयदे म्हणाल्या की, आज ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट लहान मुलं सुद्धा पाहत आहेत. अश्लील दृश्यांचा कोवळ्या मनावर परिणाम होत आहे. दरम्यान, आम्ही पुढच्या आठवड्यात नवी दिल्लीला जाणार आहोत. इन्फॉर्मेशन आणि ब्रोडकार्ड मिनिस्टरला भेटणार आहोत. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरही सेन्सारशिप आली पाहिजे.
निर्मात्यांविरोधात कारवाई करा : 'बिग बॉस ओटीटी 3' हा कार्यक्रम बंद करून या कार्यक्रमाच्या निर्मात्यांविरोधात कारवाई करावी अशी मागणी, मनिषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडं केली आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र पोलीस आयुक्तांना दिलं आहे.
हेही वाचा -