ETV Bharat / state

प्रेमसंबंधास दिला नकार; तरुणानं केली तरुणीची हत्या - THANE MURDER CASE

ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून एका २३ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली.

Thane Murder Case
तरुणीची निर्घृण हत्या (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 6:50 PM IST

ठाणे : भिवंडी शहरात प्रेमसंबंधास नकार दिल्याच्या रागातून, एका २४ वर्षीय तरुणानं २३ वर्षीय तरुणीची राहत्या घरातच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. खळबळजनक बाब म्हणजे, मोठ्या बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या लहान बहिणीवर वार करून तिलाही गंभीर जखमी करण्यात आलं. ही घटना भिवंडी शहरातील एका चाळीत घडली. याप्रकरणी हत्या करणाऱ्या आरोपीच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात (Shanti Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला. तर राजू महेंद्र सिंग (२४) असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव असून, तो फरार झालाय.

प्रेमसंबंधास दिला नकार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू हा मूळचा उत्तर प्रदेशातील आहे. तर मृत तरुणीही मूळची उत्तर प्रदेशातील भदोई जिल्ह्यातील आहे. सद्यस्थितीत ते दोघेही कुटुंबासोबत भिवंडी शहरातील एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहतात. त्यामुळं ते एकमेकांना ओळखत होते. मृत तरुणीनं राजूला प्रेमसंबंधास नकार दिला होता. याच रागातून सोमवारी (२८ ऑक्टोबर) रात्री सव्वा अकराच्या सुमारास आरोपी राजूनं तरुणीची हत्या केली.

शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा : तर दुसरीकडं तरुणीची लहान बहीण तिला वाचवण्यासाठी गेली असता, आरोपीनं तिच्यावरही वार करत तिलाही गंभीर जखमी केलं. याप्रकरणी मृत तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून कलम १०३, ३३३, ११८(१) सह ३७ (१), १३५ अन्वये राजूच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची कुणकुण लागताच आरोपी राजू हा घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस त्याचा सीसीटीव्हीच्या आधारे कसून शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अतुल अडुरकर करत आहेत.

हेही वाचा -

  1. बहिणीची छेड काढताना बघितलं, आरोपी नातेवाईकानं चिमुकल्या भावाला संपवलं - Thane Murder Case
  2. "खून का बदला खून"...; भर रस्त्यात गुन्हेगाराची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या, चार मारेकऱ्यांना अटक - Thane Murder Case
  3. ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी; कर्ज फेडण्यासाठी केला वृद्ध महिलेचा खून - Thane Murder Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.