ETV Bharat / state

तीन मुलांची आई पतीला सोडून राहत होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये; प्रियकरानं चिमुकल्याचं डोक आपटून केला खून - Man Killed Live In partners Boy - MAN KILLED LIVE IN PARTNERS BOY

Man Killed Live In partners Boy : जेवताना चिमुकल्या मुलानं उलटी केल्याच्या रागातून प्रियकरानं लिव्ह इन पार्टनरच्या मुलाचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना नाशिकमधील पंचवटी परिसरात घडली.

Man Killed Live In partners Boy
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 5, 2024, 12:01 PM IST

नाशिक Man Killed Live In partners Boy : पतीला सोडून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीच्या मुलानं उलटी केल्याचा रागातून प्रियकरानं चार वर्षाच्या मुलाचा खून केला. हा धक्कादायक प्रकार नाशिकच्या पंचवटी भागात घडला आहे. मात्र या मुलाचा मृत्यू पुणे जिल्ह्यातील रुग्णालयात झाल्यानं या प्रकरणी पुण्यातील बिबडेवाडी पोलीस ठाण्यात 103 प्रमाणं खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र घटना नाशिक येथील पंचवटी भागातील असल्यानं हा गुन्हा नाशिकच्या पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. संशयित मारेकरी महेश कुंभार याला अटक केली आहे.

Man Killed Live In partners Boy
मारेकरी महेश कुंभार (Reporter)

पतीला सोडून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती महिला : पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्याची शिरूर अनंतपाळची महिला पल्लवी वीरभद्र काळे हिला दोन मुली आणि एक मुलगा असे तीन अपत्य आहेत. मात्र गेल्या सात महिन्यांपासून पल्लवी पतीपासून विभक्त राहत होती. अशात तिचे लातूर येथील महेश कुंभार याच्याबरोबर प्रेम जुळल्यानं ती त्याच्या समवेत नाशिकच्या पंचवटीतील कृष्णानगर भागात खोली घेऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती.

चिमुकल्यानं उलटी केल्यानं सिलेंडरवर आपटलं डोकं : रविवारी 1 सप्टेंबरला रात्री अकरा वाजता घरात प्रियकर महेश कुंभार हा मुलगा वेदांशला चपाती खाऊ घालत होता. यावेळी वेदांशनं उलटी केल्याचा राग आल्यानं महेशनं त्याला मारहाण केली. यावेळी रागाच्या भरात महेश कुंभार यानं त्याच डोकं गॅस सिलेंडरवर आपटलं. मोठी मुलगी समृद्धीनं मामानं मुलाला मारल्याचं आईला सांगितल्यानं पल्लवी महेशवर रागावली. यावेळी वेदांश बेशुद्ध पडल्यानं त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला बसनं पुणे जिल्ह्यात कमला नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सदर घटनेनंतर बिबडेवाडी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला. मात्र ही घटना नाशिकची असल्यानं हा गुन्हा नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. यानंतर पंचवटी पोलिसांनी तत्काळ कृष्णा नगर भागात जाऊन संशयित महेश कुंभार याला अटक केली.

मारेकरी प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या : "संशयित महेश आणि पल्लवी हे दोघं पंचवटी भागात एकत्र राहत होते. अशात संशयित महेशनं पल्लवीच्या मुलानं जेवण करताना उलटी केल्याचा राग आल्यानं त्याचं डोके सिलेंडरवर आपटलं. अशात त्याचा उपचारादरम्यान पुणे येथील रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत पुण्याच्या बिबडेवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा आता नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग झाला असून यातील संशयित आरोपी महेश कुंभार याला आम्ही अटक केली आहे," असं पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. वनराज आंदेकर खून प्रकरणात 13 जणांना अटक, ताम्हिणी घाटातून आवळल्या मुसक्या - Vanraj Andekar Murder Case
  2. बंद घरात आढळले तिघांचे कुजलेले मृतदेह: पत्र्याच्या पेटीत माय लेकीचा तर बाथरुममध्ये वडिलाचं आढळलं शव, नागरिक हादरले - Found 3 Dead Body In House
  3. पुण्यात तरुणीचा निर्घृण खून, हातपाय कापून धड फेकलं नदीपात्रात, नागरिक हादरले - Found Girls Body Parts In Pune

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.