ETV Bharat / state

मुंबईत घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मित्रानंच केला 'गेम'; अकाउंटंट मित्राची हत्या - Man Killed Friend for House

Man Killed Friend : एकीकडं आज आपण मैत्री दिन साजरा करत आहोत. निस्वार्थी मित्रत्वाच्या गप्पा मारतो. तर दुसरीकडं एका स्वार्थी मित्रानंच मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मित्राच्या घरावर डोळा असल्यामुळं ही हत्या केल्याचं समोर आलंय. पार्टी देण्याच्या बहाण्यानं घेऊन गेला आणि दोन साथीदारांच्या मदतीनं कारमध्येच मित्राचा काटा काढला

Mumbai Crime
अटक केलेले आरोपी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 8:16 AM IST

ठाणे Man Killed Friend : मुंबईत घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मित्रानंच मित्राचा गेम केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळं एकच खळबळ उडाली. महत्त्वाची बाब म्हणजे, आरोपीनं अकाउंटंट मित्राला पार्टी देण्याच्या बहाण्यानं घेऊन गेला होता. दोन साथीदाराच्या मदतीनं आरोपीनं कारमध्येच त्याची हत्या केली. नंतर हा मृतदेह कसारा घाटातील मुंबई-नाशिक महामार्गावरील कामडी पाड्याच्या हद्दीत असलेल्या पुलाखाली नग्न अवस्थेत फेकून दिला होता.

मित्राची हत्या : आज (4 ऑगस्ट) आपण सर्वजण मैत्री दिन साजरा करत आहोत. मित्रांना कॉल, मेसेज, सोशल मीडियाद्वारे मेत्री दिनाच्या शुभेच्छा देत आहोत. सोशल मीडियावर मित्रांसोबतचे फोटो शेयर करत मोठमोठे कॅप्शन लिहित आहोत. 'मित्रासाठी कायपण', 'तूच आपला भाऊ', 'दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस' अशा शब्दांत आपण मित्रप्रेम व्यक्त करत असतोत. मात्र, एका स्वार्थी मित्रानं आपल्याच जवळच्या मित्राची हत्या केली.

आरोपी अटकेत : ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं संबंधित प्रकरणाचा सखोल तपास केला. तपास करुन आरोपी आणि त्याच्या दोन साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. चंद्रसेन पवार (वय ३३) या मित्रासह नूर मोहम्मद चौधरी (वय २१) आणि हृतिक पांडे (वय २२) असे अटक केलेल्या तिन्ही आरोपींची नावं आहेत. तर विजय जाधव (वय ३५. रा. घाटकोपर मुबंई) असं मृतकाचं नाव आहे.

मित्राचा फ्लॅटवर डोळा : माया नगरीत स्वतःचं घर असावं असं मुबंईत राहणाऱ्या बहुतांश नागरिकांचं स्वप्न असतं. घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत आणि जिद्दीनं कष्ट करून अनेकांनी मुंबईत स्वतःच्या घराचं स्वप्न साकारही केलं. मात्र, मुख्य आरोपी चंद्रसेन याचा मृतक मित्राच्या घाटकोपर येथील फ्लॅटवरच डोळा होता. मृत विजय हा एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून कार्यरत होता. त्यांचा घाटकोपर येथे एक फ्लॅट होता. तर आरोपी चंद्रसेन हा भाड्याच्या घरात राहत होता. दोघांची चांगलीच मैत्री होती. दोघेही नेहमी पार्टी करायचे. आरोपीनं मृत मित्राकडं मुंबईत घर घेण्याची उत्सुकता दाखवत होता.

काय आहे नेमकं प्रकरण? : कसारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जाधव आणि आरोपी पवार यांच्यात नुकताच वादही झाल्याचं तपासात समोर आलं. विशेष म्हणजे, आरोपी हा मृत जाधव यांच्यावर त्यांचा घाटकोपर येथील फ्लॅट कमी किमतीत विकण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र, मृत जाधव यांनी नकार दिला. तर दुसरीकडे मृत जाधव हे आपल्या पत्नीला घटस्फोट देणार आहेत. त्यामुळे पोटगीमुळे घर गमवावं लागू शकतं. हेही आरोपी पवारला समजलं होतं. त्यानंतर त्यांच्यात झालेल्या वादानंतर आरोपी पवार यांनी नूर मोहम्मद चौधरी आणि हृतिक पांडे या दोन साथीदारांसह जाधव यांच्या हत्येचा कट रचून त्यांचा गेम करण्याचं ठरवलं होतं.

मृतदेह नग्न अवस्थेत फेकून दिला : ठरल्याप्रमाणे २९ जुलै रोजी रात्री तिन्ही आरोपींनी मृत जाधव यांना पार्टीचे आमिष दाखवून घेवून गेले. मित्र दारुच्या नशेत असतांना आरोपीनं कारमध्ये त्याची हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनं आरोपींनी मृतदेह मुंबई नाशिक महामार्गावरील कामडी पाड्याच्या हद्दीत असलेल्या पुलाखाली नग्न अवस्थेत फेकून देत पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, ३० जुलै रोजी अनोखळी पुरुषाचा मृतदेह आढल्याची माहिती कसारा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत अज्ञात मारेकऱ्या विरोधात कलम १०३ (१) २३८ प्रमाणे गुन्हा करत आरोपींचा शोध सुरु केला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपींना पकडनं आव्हानात्मक : तपासादरम्यान ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं मृतदेहाची ओळख पटवून त्या दिशेनं तपास केला. घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यानं किचकट गुन्ह्याची उकल करणं पथकाला आव्हानात्मक होते. त्यामुळं गुन्ह्यात सहभागी असलेल्या विशिष्ट कारची ओळख पटवणं कठीण झालं होतं. त्यानंतर मुंबई नाशिक महामार्गावर घटनेच्या दिवशी वाहनांची तसंच कारचे विस्तृत तांत्रिक पुरावे तपासल्यानंतर, पथकाला आरोपींना शोधण्यात यश आल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी दिली. तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यापासून ३६ तासातच मुंबईतील विविध भागातून अटक करत २ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहितीही सुरेश मनोरे यांनी दिली.

हेही वाचा

  1. वादाच्या दोन घटनांनी नाशिक हादरलं; घटनेत युवकाची हत्या, दुसऱ्यात पोलिसांवर हल्ला - Nashik Crime News
  2. गोरेगावात पती पत्नीचा आढळला मृतदेह; पत्नीची हत्या करुन पतीनं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय - Goregaon Couple Found Dead

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.