ETV Bharat / state

अल्पवयीन प्रेयसीचं अपहरण करुन बलात्कार: प्रियकराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Man Kidnapped Minor Girl And Raped - MAN KIDNAPPED MINOR GIRL AND RAPED

Man Kidnapped Minor Girl And Raped : अल्पवयीन प्रेयसीचं अपहरण करुन तिच्यावर प्रियकरानं लैंगिक अत्याचार केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी नराधम प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Man Kidnapped Minor Girl And Raped
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 7:55 PM IST

ठाणे Man Kidnapped Minor Girl And Raped : अल्पवयीन प्रेयसीचं बाहाण्यानं अपहरण करुन तिच्यावर 28 वर्षीय प्रियकरानं अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या आधारे मुरबाड पोलिसांनी शिताफीनं तपास करत कल्याण तालुक्यातील शीराढोण गावातून 28 वर्षीय प्रियकराला अटक केली आहे.

शाळेत गेल्यावर नराधमानं केलं अपहरण : पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पीडित 17 वर्षीय मुलगी मुरबाड तालुक्यातील एका गावात कुटूंबासह राहते. तसेच ती याच भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. तर 28 वर्षीय आरोपी हाही पीडितेच्या गावच्या शेजारी राहणाऱ्या गावात राहतो. त्यामुळं दोघांची ओळख होती. त्यानंतर ओळखीचं रुपांतर प्रेमात झाल्यानं दोघंही एकमेकांना भेटत होते. त्यातच 17 ऑगस्ट रोजी पीडित मुलगी शाळेत जाण्याच्या बहाण्यानं शाळेच्या युनिफॉर्मवर असतानाच सकाळच्या सुमारास तिचं राहत्या गावातून अपहरण केल्याची तक्रार तिच्या घरच्यांनी मुरबाड पोलीस ठाण्यात दिली होती.

पीडित मुलीला आरोपीच्या गावातून घेतलं ताब्यात : अपहरणाच्या घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद सुर्वे यांच्यासह मुरबाड ग्रामीण तालुका पोलीस पथकानं तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेतला. यावेळी आरोपीनं त्याच्या एका मित्राला संपर्क केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन कल्याण तालुक्यातील एका गावात आरोपी असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकानं तालुक्यातील शीराढोण गावात सापळा रचून आरोपी आणि पीडित मुलीला 23 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतलं. दरम्यान पीडित मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीवर अपहरण, अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. त्याला 24 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपीला 27 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनवाल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विनोद सुर्वे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

  1. धक्कादायक! शाळकरी मुलीला दारू पाजून बलात्कार, अल्पवयीनांसह मैत्रिणीविरुद्ध गुन्हा दाखल - Rape Of Minor Girl
  2. बदलापूर पाठोपाठ मुंबईत आठ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार - Molestation
  3. शाळेच्या शौचालयात दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार, 23 वर्षीय नराधमाला ठोकल्या बेड्या - Thane Rape News

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.