ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ - Ahmednagar Health Department

Ahmednagar Health Department : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आरोग्य विभागामार्फत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर काही दिवसांपूर्वीच भरवण्यात आलं होतं. मात्र, येथे रुग्णांसाठी पुरेशी सुविधा नसल्यानं शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला रुग्णांना बेडअभावी खालीच झोपावं लागलं. याबद्दल रुग्णालय विभागाला प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर देण्याचं टाळलंय.

Ahmednagar Health Department
जमिनीवर झोपलेल्या महिला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 7:40 PM IST

आरोग्य विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणताना सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे

अहमदनगर Ahmednagar Health Department : जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील आरोग्य विभाग अंतर्गत कुटुंब कल्याण नियोजन शस्त्रक्रिया शिबिर भरवण्यात आलं होतं. यासाठी अनेक गावातून प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कार्यक्षेत्रातील गोरगरीब महिला रुग्णांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर नेवासा तालुक्यातील वडाळा येथील FJFM या हॉस्पिटलमध्ये घेण्यात आलं. मात्र, रुग्णांची कुठल्याही प्रकारची सोय नसताना तसंच पुरेसे बेड उपलब्ध नसताना देखील आरोग्य यंत्रणेनं फक्त आणि फक्त त्यांच्या केसेस टार्गेटसाठी दीडशेहून अधिक ऑपरेशन केल्याची माहिती उघड झाली.

महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ : नेवासा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश शेटे यांनी हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आणला. शनिवारी (20 एप्रिल) मध्यरात्रीचा हा सर्व प्रकार आहे. एकीकडं पाऊस, त्यात लाईट गेलेली आणि अपुरी बेड व्यवस्था यामुळं अनेक महिलांना शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याचं यातून समोर आलंय.

हॉस्पिटल व्यवस्थापनानं बाजू मांडण्यास दिला नकार : वास्तविक पाहता रुग्णांना पूर्ण सुविधा, बेड तसंच लाईट आणि पाणी सुविधा असेल तरच अ‍ॅडमिट करण्यात येतं. परंतु, FJFM हॉस्पिटल येथे अपुरी सुविधा असून, देखील हे हॉस्पिटलच का निवडलं गेलं, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. यात हॉस्पिटल व्यवस्थापनाबरोबर संपर्क साधला असता, त्यांची बाजू सोमवारी (22 एप्रिल) मांडणार असल्याचं त्यांनी सांगत प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. तसंच रविवारी सुट्टी असल्यानं शासकीय अधिकारी यांची देखील प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

यवत ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची गैरसोय : शासकीय रुग्णालयातील गैरसोयीच्या घटना नेहमीच पुढे येत असतात. अशीच घटना पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत येथे उघडकीस आली होती. यवत येथील ग्रामीण रुग्णालयाबाबत रुग्णांच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. रुग्णालयात सर्व सुविधा असूनही रुग्णांची गैरसोय होत असल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र बरे होते, असे म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.

गरीब रुग्णांचा कोणीच वाली नाही : ग्रामीण रुग्णालयात बाळंतपण, एक्सरे, बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्णांसाठी विविध कक्ष, रक्त, लघवी आणि इतर तपासण्यांचा कक्ष अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, काही अधिकारी आणि कर्मचारी येणाऱ्या रुग्णांना उपलब्ध असलेलेही उपचार करण्याची टाळाटाळ करत असतात. अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. पीडित रुग्ण अत्यंत गरीब कुटुंबातील असल्यानं त्यांच्या तक्रारींची कोणी दखल घेत नाहीत.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान पदावरुन संजय राऊत नाना पटोलेंमध्ये जुंपली; राऊत म्हणाले 'उद्धव ठाकरे होऊ शकतात पंतप्रधान पदाचे उमेदवार' - Sanjay Raut Slams Nana Patole
  2. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात लोढा की नार्वेकर? 'सागर'वर रात्री महत्त्वपूर्ण बैठक - South Mumbai
  3. ठाकरे गटाचं प्रचार गीत वादात; उद्धव ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच झापलं, मोदी-शाहांवरही हल्लाबोल - Uddhav Thackeray on ECI

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.