ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूने मालेगावच्या महिलेचा मृत्यू, आरोग्य विभाग सतर्क - Swine Flu At Nashik

Swine Flu At Nashik : नाशिक जिल्ह्यात मलेरिया, डेंग्यूची साथ आटोक्यात येत नाही तोच स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू लागले आहेत. मालेगावाच्या एका महिलेचा नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात सिन्नर तालुक्यातील दातली गावातील एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता. याबाबत नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असं आवाहन महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केलं आहे.

Swine Flu At Nashik
Swine Flu At Nashik
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 24, 2024, 11:01 PM IST

नाशिक Swine Flu At Nashik : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याने महानगरपालिका आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. स्वाइन फ्लू संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. खोकला, सर्दी, तापाची लक्षणे आढळल्यास तत्काळ रुग्णालयात उपचार घेण्याचं आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीनं करण्यात येत आहे. गेल्या वर्षी शहरात डेंग्यूने थैमान घातलं होतं; परंतु सद्यस्थितीत स्वाइन फ्लूच्या रूपाने शहरातील रहिवाशांमध्ये नवे संकट उभे राहिले आहे. शहरात गेल्या आठवड्याभरापासून तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे असून त्यामुळे तापाचे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याने रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहेत. सिन्नर आणि मालेगाव येथील दोन्ही महिलांचा नाशिकच्या खासगी रुग्णालयात मृत्यू झालाय. या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

लक्षणे आढळल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा : सिन्नर तालुक्यातील दातलीच्या महिले पाठोपाठ मालेगावच्या महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला; रुग्णांना काही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता रुग्णालयात संपर्क साधावा, हलका आहार घ्यावा, जास्त थंड पाणी पिऊ नये, घसा खवखवत असल्यास तातडीने आरोग्य केंद्रात जावे असं आवाहन महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी केलंय.

रोज माहिती देणे बंधनकारक : नाशिक शहरातील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूचा रुग्ण दाखल झाल्यानंतर रोज त्याची माहिती देणे बंधनकारक आहे; 650 रुग्णालयांना पत्र काढून माहिती तत्काळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली आहे.

'ही' आहेत लक्षणे : स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या लक्षणांमध्ये बऱ्यापैकी साम्य आहे. यात ताप, सर्दी, थंडी, घसादुखी, अंगदुखी, खोकला, पोटदुखी, उलटी, जुलाब, मळमळ अशा लक्षणांचा समावेश आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू टाळण्यासाठी वारंवार साबणाने हात धुवावे, पौष्टिक आहार घ्यावा, आवळा, मोसंबी, संत्री आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करावा. पुरेशी झोप घ्यावी तसेच रुग्णांनी मास्क वापरावे असं आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाने केलं आहे.

हेही वाचा :

  1. गेल्या वर्षी बॉक्स ऑफिसवर 19 हजार कोटींची कमाई, चित्रपट पाहणाऱ्यांमध्ये साऊथ इंडियाचे प्रेक्षक आघाडीवर - Indian Box Office
  2. केवळ 22 अरबपतींना नाही, तर कोट्यवधी लोकांना लखपती करणार; राहुल गांधी यांची घोषणा - Lok Sabha Election 2024
  3. शरद पवारांच्या काळात सर्वाधिक आत्महत्या, शेतकरी आत्महत्येसाठी पवारांनी माफी मागावी - अमित शाह - Amit Shah On Sharad Pawar

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.