ETV Bharat / state

2024 च्या निवडणुकीत महायुतीच्या 'या' पाच योजना ठरल्या गेमचेंजर; वाचा सविस्तर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीच्या विजयात शिंदे सरकारच्या पाच योजनांचा मोठा वाटा होता. या योजना कोणत्या याविषयी जाणून घेऊया.

Mahayuti victory in Maharashtra, know about 5 scheme that become game changer
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

मुंबई : विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. मागील अडीच वर्षाच्या काळात महायुती सरकारनं अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या. यामुळंच महायुतीला जनतेनं कौल दिला असल्याचं राजकीय जाणकार आणि तज्ञ यांनी म्हटलंय. दरम्यान, महायुती सरकारनं अनेक योजना आणल्या होत्या. परंतु, त्यातील गेमचेंजर ठरलेल्या महत्त्वाच्या पाच योजना कोणत्या? हे बघूया.

1) मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना : निवडणुकीपूर्वी झालेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतले. तसंच अनेक योजना जाहीर केल्या. नव मतदारांसाठी त्यातील महत्त्वाची योजना ठरली, ती म्हणजे 'मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना'. रोजगार संधी आणि युवांना प्रोत्साहन देणारी ही योजना तरुणांसाठी महत्त्वाची ठरली. या योजनेमुळं महायुती सरकारला एक नवमतदार वर्ग मिळाला. ही योजना तरुणांच्या पसंतीत उतरली. त्यामुळं कित्येक तरुणांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला मतदान केलं असल्याचं बोललं जातंय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत (इंटर्नशिप योजना) यामध्ये 5500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवता आला. या योजनेत बारावी पास, आयटीआय उमेदवार आणि पदवीदारांसाठी कमी जास्त प्रमाणात पगार देऊन इंटर्नशिप देण्यात आली. त्यामुळं ही योजना महायुतीसाठी फायदेशीर ठरली असल्याचं बोललं जातंय.

2) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेची घोषणा पावसाळी अधिवेशनादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलेला प्रत्येक महिन्याला 1500 रुपये खात्यात जमा करण्यात आले. ही योजना गाव-खेड्यासाठी क्रांतिकारी योजना ठरली. सरकारी आकडेवारीनुसार 2 कोटी 74 लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यातील 50% महिलांनी जरी महायुतीला मतदान केलं असेल तर ते कोटीच्या घरात जातं. त्यामुळं 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही योजना ऐतिहासिक आणि क्रांतिकारी योजना ठरली. दरम्यान, या योजनेला राज्यभरात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळाला. निवडणुकीपूर्वी या योजनेत 1500 रुपयांत वाढ करुन 2100 रुपये देण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं. आता पुन्हा एकदा महायुती सत्तेत आल्यामुळं आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार आहेत.

3) मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या योजनेबरोबर महायुतीची आणखी एक योजना चर्चेत राहिली ती म्हणजे 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना'. राज्यात गरीब कुटुंबासाठी ही योजना आणल्याचं सरकारनं म्हटलं होतं. या योजनेंतर्गत एका कुटुंबात 5 सदस्य असणाऱ्या कुटुंबाला प्रत्येक वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. गरीब कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळाल्यामुळं त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आणि लाभदायक ठरली.

4) 50% महिलांना एसटी प्रवास मोफत : महायुती सरकारनं निवडणुकीच्या काही महिने अगोदर आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यानंतर या निर्णयाचं रूपांतर योजनेत करण्यात आलं. ही योजना म्हणजे एसटी प्रवासात महिलांना 50 टक्के सूट देणे. या अंतर्गत शिवनेरी, शिवशाही, निमआराम गाड्या, विना वातानुकूलित, मिनीबस आणि साधी बस यामध्ये सवलत देण्यात आली. त्यामुळं महिलांनी या योजनेचा भरपूर फायदा घेतला. याचाच परिणाम म्हणजे निवडणुकीत महिलांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याचं बोललं जातंय.

5) लेक लाडकी योजना : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' आणि 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना' या महत्त्वपूर्ण योजनानंतर महायुती सरकारनं निवडणुकीच्या आधी आणखी एक महत्त्वपूर्ण योजना आणली होती. 'लेक लाडकी योजना' ही योजना आणून महिला आणि मुलींसाठी हे सरकार किती गंभीरपणे काम करतंय, असं दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. राज्यातील मुलींना शिक्षण क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना आणली असल्याचं महायुतीतील नेत्यांकडून सांगण्यात येतंय. या योजनेंतर्गत वयाच्या 18 वर्षापर्यंत मुलीच्या खात्यात सरकारकडून 75 हजार रुपयाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तसंच मुलींच्या उच्च शिक्षणासाठीही सरकारकडून मुलींना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या योजनेचा फायदा गरीब कुटुंबातील लेकींना होणार असल्यामुळं लोकांनी महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचं राजकीय विश्लेषक आणि जाणकार सांगत आहेत.

हेही वाचा -

  1. 2024 मध्ये RSS ची भूमिका काय? संघ अभ्यासक श्रीपाद कोठे म्हणाले,"राजकारणात हिंदू आणि हिंदुत्वाचा विचार..."
  2. 'लाडकी बहीण योजना' महायुतीसाठी कशी ठरली गेम चेंजर? महाविकास आघाडीला बसला मोठा धक्का
  3. भाजपानं महाविजय कसा मिळवला? कोडं उलगडलं, जाणून घ्या भाजपाचा बूथ मॅनेजमेंट फॉर्म्युला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.