ETV Bharat / state

मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये उमटणार बंडाचे पडसाद ? महायुती की मविआ मारणार मैदान ? अबू आझमींचा गड होणार खालसा ? - ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीला बंडखोरांचं ग्रहण लागलं आहे. मानखुर्द शिवाजीनगर मतदार संघात बंडखोरी झाली असून अबू आझमींसमोर तगडं आव्हान आहे.

ASSEMBLY ELECTION 2024
संपादित छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2024, 10:52 AM IST

Updated : Nov 1, 2024, 2:28 PM IST

मुंबई : महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणूक 2024 चा ज्वर चांगलाच चढला आहे. दिवाळीनंतर सत्ताधारी आणि विरोधक यांच्या प्रचारादरम्यान तोफा धडाडणार आहेत. तर दुसरीकडं महायुती आणि महाविकास आघाडीला बंडाचं ग्रहण लागलं आहे. तिकीट न मिळालेल्या इच्छुकांनी बंडाचं हत्यार उगारलं असून, 50 च्या वर अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मुंबईतील ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. या मतदारसंघात मागील सलग 3 वेळा समाजवादी पार्टीचे अबू आझमी हे आमदार आहेत. मात्र आता इथं महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंड करण्यात आलं आहे.

ASSEMBLY ELECTION 2024
विधानसभा निवडणूक आकडेवारी (ETV Bharat)

महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवाराचं बंड : महाविकास आघाडीतून उबाठा नेते राजेंद्र वाघमारे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांनी अर्ज दाखल केलाय. दुसरीकडं शिंदे गटाचे सुरेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलाय. तर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेले आबू आझमी यांनी समाजवादी पार्टीकडून अर्ज दाखल केलाय. त्यामुळं इथं महायुती आणि मविआकडून बंड झाल्याचं पाहायला मिळतंय. या मतदारसंघात काय आहेत समस्या? मतदारसंघाचा इतिहास काय आहे? सध्याची परिस्थिती काय आहे? आणि कोण मारणार बाजी? या सर्वांचा आज आपण आढावा घेणार आहोत.

Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (Reporter)

मतदारसंघात कशी आहे मतांची टक्केवारी ? : मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात 2009 पासून समाजवादी पार्टीचे आबू आझमी हे सलग तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. हा मतदारसंघ ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. 2009 साली झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर मानखुर्द-शिवाजीनगर मतदार संघ अस्तित्वात आला आहे. पुनर्रचनेनंतर म्हणजे 2009 नंतर आतापर्यंत आबू आझमी यांनी इथं विजयाची हॅट्रिक साजरी केली. मात्र यावेळेला आबू आझमी यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली नाही, तर आबू आझमींना गड राखणं अवघड जाणार आहे. सध्या येथे महाविकास आघाडीची चांगली ताकद आहे. या मतदारसंघात 60 टक्के मतदार हे शिवाजीनगरमध्ये राहतात तर 40 टक्के मतदार हे मानखुर्दमध्ये राहतात. शिवाजीनगरमध्ये बहुसंख्यवस्ती ही मुस्लीमबहुल समाजातील आहे. मुस्लीम मतदारांच्या जोरावर आबू आझमी मागील तीन वेळा निवडून आल्याचं बोललं जातंय. तर मानखुर्दमध्ये शिवसेना उबाठाची बऱ्यापैकी ताकद आहे. इथं आबू आझमी यांनी समाजवादी पार्टी या पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. तर महाविकास आघाडीतून शिवसेना उबाठाचे राजेंद्र वाघमारे यांनी अर्ज दाखल केला. इथं महायुतीतून नवाब मलिक आणि शिंदे गटाचे सुरेश पाटील यांनी अर्ज दाखल केल्यामुळं जर 4 नोव्हेंबरपर्यंत कोणी अर्ज मागं घेतला नाही, तर इथं चौरंगी लढत होणार आहे.

मतदारसंघाच्या का आहेत समस्या ? : मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात मराठी, मुस्लीम, उत्तर भारतीय समाजातील लोकं मोठ्या प्रमाणात राहतात. मानखुर्दमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी आणि हिंदू भाषिक लोकवस्ती आहे तर शिवाजीनगरमध्ये मुस्लीम बहुल समाजातील लोकं मोठ्या प्रमाणात राहतात. मुस्लीम मतदारांच्या जोरावर आबू आझमी हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. त्यांच्या मतदानावरच ते निवडून येतात, असं बोललं जातंय. दरम्यान, भौगोलिकदृष्ट्या मतदारसंघाचा विचार केल्यास या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झोपडपड्डी, चाळी आणि आता चाळीची जागा मोठ्या गगनचुंबी इमारतींनी घेतली आहे. मात्र या मतदारसंघात चांगले रस्ते, मुबलक पाणी या समस्या असल्याचं नागरिकांचे म्हणणं आहे. याचबरोबर मानखुर्द-शिवाजीनगरमध्ये देशातील सर्वात मोठे आणि जुने लँडफील अर्थात देवनार डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंग ग्राउंडवर मुंबई आणि परिसरातील घणकचरा टाकला जातो. परिणामी या कचऱ्यामुळं या मतदारसंघातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतात. आरोग्य धोक्यात येत असल्याचा नागरिकांचा दावा आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडवरून मोठमोठ्या चर्चा होती. या विषयावरून विधिमंडळाच्या सभागृहात चर्चा केली जाते. मात्र प्रश्न काही मार्गी लागताना दिसत नाही. देवनार डम्पिंग ग्राउंडवरून तिथले स्थानिक आमदार अबू आझमी यांनी वारंवार सभागृहात आवाज उठवला आहे. जो घनकचरा टाकला जातो किंवा जाळला जातो. त्यामुळं रहिवाशांच्या जीवाला धोका असल्याचंही तज्ञांचं म्हणणं आहे. देवनार डम्पिंग ग्राउंड हे इथून स्थलांतरित व्हावे यासाठी रहिवाशांनी आंदोलन केलं. सध्या या ग्राऊंडवरून न्यायालयात लढा देखील सुरू आहे.

बंड तरी पण कोण मारणार बाजी ? : 2024 विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंड झाल्याचं पाहायला मिळत आहे. मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना उमेदवारी दिली असली तरी, मलिक यांचं नाव वादग्रस्त आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी जमीन व्यवहारात मलिकांचे संबंध असल्याचा आरोप करत त्यांचा आम्ही प्रचार करणार नसल्याचं भाजपा नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. म्हणून महायुतीनं इथं शिवसेना नेते सुरेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडं महाविकास आघाडीत शिवसेना उबाठाकडून राजेंद्र वाघमारे यांना उमेदवारी दिली आहे. समाजवादी पार्टीकडून आझमी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीत आबू आझमी हे महाविकास आघाडीसोबत होते. मात्र या वेळेला त्यांनी स्वतःच्या पक्षासाठी पाच जागांची मागणी केली. पाच जागा मिळाल्या नसल्यामुळं ते नाराज आहेत. परंतु ते महाविकास आघाडीसोंबत आहेत की नाहीत? हे अजून त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. हे चार नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होईल. मात्र इथं सध्या पक्षीय बलाबल पाहता, महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे. तर आबू आझमींना गड राखणं सोपं जाणार नाही. परंतू शेवटी विजयी कोण होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. अबू आझमी संगमनेर दौऱ्यावर, ग्रामस्थांचा रोष पाहून पोलिसांनी रोखलं, पाहा व्हिडिओ
  2. Abu Azami IT Raid : अबू आझमींच्या मालमत्तांवर आयकर विभागाची छापेमारी, अबू आझमी म्हणाले...
  3. Dipak kesarkar : औरंगजेब क्रूर राजा, दिपक केसरकर यांच्याकडून अबू आझमींना प्रत्युत्तर

Last Updated : Nov 1, 2024, 2:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.