ETV Bharat / state

रावसाहेब दानवेंसोबत हे काय घडलं? प्रचार राहिला बाजुला अन् मराठा आंदोलकांचाच करावा लागला सामना - Raosaheb Danve Vs Maratha - RAOSAHEB DANVE VS MARATHA

Raosaheb Danve Vs Maratha : छत्रपती संभाजीनगर येथील पळशी गावात आज महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमने-सामने आले. अखेर पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

Raosaheb Danve Vs Maratha
दानवे प्रचार (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 4, 2024, 11:00 PM IST

दानवे यांच्या प्रचारात मराठा आंदोलकांनी आणला अडथळा (Reporter)

छत्रपती संभाजीनगर Raosaheb Danve Vs Maratha : जालना लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना आज (4 मे) मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. छत्रपती संभाजीनगरमधील पळशी गावात प्रचारासाठी गेले असता रावसाहेब दानवे आल्याने मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी भाजपा कार्यकर्ते आणि मराठा आंदोलक आमने-सामने आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू होती. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांना यावेळी हस्तक्षेप करावा लागला. यावेळी भाजपा आमदार हरिभाऊ बागडे देखील उपस्थित होते.

प्रचार सुरू असताना झाला प्रकार : लोकसभा निवडणुकाच्या अनुषंगाने जालना मतदारसंघाचे भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे प्रचार करत आहेत. जालना लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद मतदार संघातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यात असलेल्या फुलंब्री मतदानसंघातील पळशी या गावात शनिवारी 4 मे रोजी सकाळी रावसाहेब दानवे माजी विधानसभा अध्यक्ष आणि फुलंब्रीचे भाजपा आमदार हरिभाऊ बागडे हे प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी अचानक मराठा समाजाच्या लोकांच्या रोशाला त्यांना सामोरे जावं लागलं. प्रचार करत असताना भाजपाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू असताना अचानक मराठा क्रांती मोर्चाच्या लोकांनी त्यांना अडवलं आणि सरकार विरोधी घोषणा सुरू केल्या.

कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची : भाजपा उमेदवार रावसाहेब दानवे आणि भाजपा आमदार हरिभाऊ बागडे प्रचार करत असताना मराठा समाजाच्या आंदोलकांनी त्यांना अडवलं. त्यामुळे प्रचार अर्धवट सोडून त्यांनी निघून जाणे पसंत केले; मात्र त्यानंतर एकीकडे भाजपा कार्यकर्ते आणि दुसरीकडे मराठा आंदोलन या दोघांची घोषणाबाजी सुरू होती. काही वेळात दोन्ही गट एकमेकांच्या समोर येऊन जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यात पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना बाजूला सारले. परंतु, या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवारांना अडवू नका, मतदानातून आपला रोष व्यक्त करा असं सांगितलं. तरी मात्र आजही उमेदवारांना अशा पद्धतीनं अडवण्याचा प्रकार सुरू आहेत. याआधी नांदेड जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपाचा प्रचार करत असताना त्यांना देखील अडवण्यात आले होते. घेराव घालून त्यांना आरक्षणाबाबत जाबही विचारण्यात आला होता. तर त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना देखील अडवून जाब विचारण्याचा प्रकार झाला. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत हा रोष अधिक वाढला आहे का? असा प्रश्न निर्माण होतोय.

हेही वाचा :

  1. अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा परिचारिकेवर बलात्कार; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न - Palghar Crime
  2. मित्र असावा तर असा! निवडणुकीत मित्राचा विजय व्हावा म्हणून पठ्ठ्याचा बार्शी ते पुणे सायकलीवर प्रवास - Lok Sabha Election
  3. आदिवासी कुपोषित महिलांच्या जीवनात बदल घडवणार, अमृता फडणवीस यांचा निर्धार - Amruta Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.