मुंबई- मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबले. अंधेरीतील एमआयडीसीत मॅनहोलमध्ये बुडून ४५ वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार विमल गायकवाड या महिलेचा उघड्या ड्रेनमध्ये पडून मृत्यू झाला. तिची मुंबई अग्नीशमन दलाकडून सुटका करण्यात आली. महिलेला कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिला डॉक्टरांनी तपासून मृत जाहीर केलं.
मुसळधार पावसामुळे चुन्नाभट्टी रेल्वे स्टेशनजवळील रेल्वे रुळावर पाणी साचल्यानं प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले. शहरातही वाहतुकीची कोंडी दिसून आली. मुसळधार पावसाचा काही प्रमाणात विमानसेवेला फटका बसला. दोन विमाने मुंबई विमानतळावरून इतरत्र वळविण्यात आली.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी हे सातत्याने परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) September 25, 2024
From the… pic.twitter.com/BVxWIhGtYF
मुंब्रा बायपासजवळ कोसळली दरड- कुर्ला पूर्व, नेहरू नगर, चेंबूरमध्ये पावसाचे मोठ्या प्रमाणात तुंबलं होते. तर चेंबुरसह कुर्ला पुलाजवळ वाहतूक कोंडी झाली. दुपारी मुंब्रा हायपासजवळ दरड कोसळल्यानंतर तीन तासांहून जास्त काळ वाहतूक कोंडी झाली. अग्नीशमन दलाचे अधिकारी स्वप्नील सरनोबत म्हणाले, "सुमारे तीन तास वाहतूक कोंडी झाली. यावेळी वाहतूक विभाग आणि पोलिसांनी वाहतूक नियंत्रित केली. सुदैवानं दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत कोणातीही जीवितहानी झालेली नाही."
#WATCH | Mumbai, Maharashtra | Railway commuters walked on tracks at the Chunabhatti Railway station as Mumbai faced severe waterlogging followed by torrential rains. (25.09) pic.twitter.com/ewA8caiAIO
— ANI (@ANI) September 25, 2024
गरज असेल तर घराबाहेर पडा-मुंबई पोलिसांनी एक्स मीडियावर पोस्ट करत नागरिकांना गरज असेल तर घराबाहेर पडण्याचा सल्ला दिला. बृहन्मुंबईचे आयुक्त भुषण गगरानी यांनी शहरातील पावसाच्या स्थितीची माहिती जाणून घेतली. त्यांनी म्हटले, "गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
#WATCH | Mumbai, Maharashtra | Railway commuters walked on tracks at the Chunabhatti Railway station as Mumbai faced severe waterlogging followed by torrential rains. (25.09) pic.twitter.com/ewA8caiAIO
— ANI (@ANI) September 25, 2024
राज्यात काय आहे पावसाची स्थिती- हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवटे यांनी पुणे शहरासंह पिंपरी महापालिकेतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागानं ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी लातूर जिल्ह्यात पूरस्थितीला तोंड देण्याकरिता उपाययोजना करण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.तेरणा, मांजरा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे काठाजवळ राहणाऱ्या लोकांना गरज भासली तर स्थलांतिरत करण्याच्या सूचना महाजन यांनी दिल्या आहेत.
हेही वाचा-