ETV Bharat / state

साताऱ्यातील वाईमध्ये महिला गेली ओढ्याच्या पुरात वाहून, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद - Heavy Rainfall in Maharashtra

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 10:47 AM IST

Updated : Jul 25, 2024, 10:50 PM IST

Maharashtra rain live updates
राज्यात मुसळधार पाऊस (Source- ETV Bharat)

सातारा - जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने दाणादाण उडवली आहे. त्यामुळे जावळी महाबळेश्वर वाई तालुक्यातील अनेक साखरपुल पाण्याखाली गेली असून ओढ्यांना देखील पूर आला आहे. धनावडे वस्ती (ता. वाई) येथील ३८ वर्षीय महिला किवरा ओढ्याच्या पुरात वाहून गेली आहे. शिल्पा प्रकाश धनावडे, असं महिलेचं नाव असून तिचा अद्याप शोध लागलेला नाही.

मुसळधार पावसामुळे पर्यटनस्थळी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा व भिलार धबधबा तसेच सर्व पर्यटनाचे पॉईंट, पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबा, कास तलाव तसेच जावली तालुक्यातील एकीव ही धबधब्याची ठिकाणे आणि सातारा जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे तात्पुरती बंद करण्याचा आदेश दिला आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत पर्यटकांना दि.28 जुलै पर्यंत संबंधित ठिकाणी जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

LIVE FEED

10:49 PM, 25 Jul 2024 (IST)

साताऱ्यातील वाईमध्ये महिला गेली ओढ्याच्या पुरात वाहून, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद

7:19 PM, 25 Jul 2024 (IST)

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाण्यातील शाळांना सुट्टी : आयुक्त सौरभ राव

ठाणे - शहरात आज पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असून एका दिवसात 180 मि.मी इतका पाऊस झालेला आहे. तसेच हवामानखात्याने रेड ॲलर्ट जाहीर केला होता. त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थतीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. आज झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महापालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देवून दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला, तसेच उद्या देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुकतांनी संबंधितांना दिले.

6:07 PM, 25 Jul 2024 (IST)

कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटाने उघडले, ११०५० क्युसेक्स पाणी सोडलं, विसर्ग वाढणार

सातारा - कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सायंकाळी पाच वाजता उघडण्यात आले आहेत. दरवाजांतून १० हजार क्युसेक्स आणि पायथा वीजगृहातून १०५०, असा एकूण ११०५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. दरम्यान सायंकाळी सात वाजता धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग २०,००० हजार क्युसेक्स करण्यात येणार आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक 85 हजार क्युसेक्सवर पोहचली आहे. गुरू संध्याकाळी ५ वाजता धरणामध्ये एकूण ७८.२९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. दिवसभर कोयनानगर येथे ९० मिलीमीटर, नवजा येथे ७० आणि महाबळेश्वर येथे ७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

5:17 PM, 25 Jul 2024 (IST)

राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे पाच दरवाजे उघडले आहेत. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळं धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढली आहे.

4:40 PM, 25 Jul 2024 (IST)

सातारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर

सातारा - हवामान विभागाने जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (26 जुलै) सातारा जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव सुट्टी जाहीर केली आहे.

शाळा व महाविद्यालयातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे. तसेच इयत्ता 10 वी व 12 वी च्या जुलै 2024 च्या फेर परीक्षा राज्य मंडळ पुणे यांचे वेळापत्रकानुसार सुरू राहतील, असं जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटलं आहे.

4:38 PM, 25 Jul 2024 (IST)

गृह विभागाची बोट वाऱ्यामुळे सुटून कोयना धरणाच्या भिंतीकडे आली, तासाभर विलंबाने उघडणार दरवाजे

सातारा - कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज चार वाजता उघडण्यात येणार होते. परंतु, गृह विभागाची बोट धरणाच्या भिंतीकडे आल्यामुळे दरवाजे उघडण्यास विलंब झाला आहे. आता सायंकाळी ५ वाजता धरणाचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. धरण क्षेत्रात पावसाबरोबर वाऱ्याचाही जोर आहे. धक्क्याच्या ठिकाणी बांधून ठेवलेली गृह विभागाची बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे सुटून धरणाच्या दरवाज्याजवळ आल्यामुळे दरवाजे उघडण्यास अडचणी आल्या .

4:24 PM, 25 Jul 2024 (IST)

राज्यात पावसाचा कहर; पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार

पुणे - पुणे शहर तसेच आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक घरात पाणी शिरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील पावसाचा आढावा घेत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथे भेट देत माहिती घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली.

कर्नाटक सरकारला विनंती : मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि खासकरून पुण्यात परिस्थिती गंभीर स्वरूपाची झाली आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि इतर ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अलमट्टी धरणातून अडीच लाख क्सुसेक्सने विसर्ग सुरू असून तो तीन लाख क्युसेक्सने वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंती करण्यात आली आहे. तसेच पुण्यातील खडकवासला धरणातून पाणी सोडायचे असल्यास ते पाणी आधीच सोडा, अंधार पडल्यानंतर नको, असे जलसंपदा विभागाला सांगितले आहे. तसेच सिंहगड रोडवरील एकता नगरमध्ये भारतीय सैन्याचे १०० जवान तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर एनडीआरएफचे जवान देखील तैनात करण्यात आले आहेत, असं यावेळी अजित पवार म्हणाले.

4:02 PM, 25 Jul 2024 (IST)

शिरगाव येथे रस्त्यावर कोसळली दरड; भिमाशंकर- भोरगिरीकडे जाणारी वाहतूक ठप्प

पुणे (खेड) : खेड तालुक्यातील दळणवळणच्यादृष्ट्या मुख्य मानला जाणारा शिरूर- भीमाशंकर राज्य मार्गावर शिरगांव येथील नेकलेस धबधब्याजवळ डोंगराचा काही भाग कोसळला आहे. यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात दमदार पाऊस सुरु असल्याने मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पावसाचा जोर सुरूच असून आज गुरूवारी पहाटेच्या दरम्यान शिरूर- भीमाशंकर मार्गावर दरड कोसळली. डोंगराचा भाग कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर माती, दगड तसेच मोठी झाडे, विद्यूत खांब रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. तसेच रस्ता पुर्णपणे निसरडा झाला आहे. हा रस्ता वर्दळीचा असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सुदैवाने यात कोणतीच जीवितहानी झाली नाही.

3:46 PM, 25 Jul 2024 (IST)

भंडारादरा पानलोटात जोरदार पाऊस

अहमदनगर : भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. तर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरले आहे. आदिवासी बांधवांच्या भात लागवडीस वेग आला आहे. पावसाचे माहेरघर समजल्या जाणा-या घाटघरमध्ये 345 मि मी पावसाची नोंद झाली आहे.

अकोले तालुक्यातील घाटघर, रतनवाडी, पांजरे व इतर धरण पाणलोटातील गावांमधील भातखाचरे तुडुंब भरल्याचे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे भात लागवडीला (आवणी) आता वेग घेतला आहे. बुधवारी रतनवाडी व घाटघर परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे घाटघर येथील उर्ध्वं उदचन प्रकल्पही पुर्ण क्षमतेने भरून वाहु लागला. उडदावणे येथील काळू नदीही दुथडी भरुन वाहत आहे.

3:35 PM, 25 Jul 2024 (IST)

पुण्यात मुसळधार पाऊस, घरात शिरलं पाणी, अनेकांचं मोठं नुकसान

पुणे : पुणे शहर तसेच आजूबाजूच्या भागात मुसळधार पाऊस सुरू असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक घरात पाणी शिरले आहे, तर काही भागात झाडं पडल्याच्या घटना घडल्या आहेत. पुणे शहरातील उपनगरांमध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली आहे. यामुळे जनजीवन हे विस्कळीत झालं आहे. पुण्यातील सिंहगड रोडवरील एकता नगर येथे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक सोसायटींमधील नागरिक हे अडकले असून, त्यांच्या बचावासाठी प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू आहे.

2:19 PM, 25 Jul 2024 (IST)

मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा, सर्व शाळा आणि सर्व महाविद्यालयांना सुट्टी

भारतीय हवामान खात्याद्वारे मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि सर्व महाविद्यालयांना सुट्टी घोषित करण्यात आली आहे. या अनुषंगाने शाळा सोडताना शिक्षकांनी संबंधित पालक प्रतिनिधी यांना कळवून आणि आवश्यक ती खबरदारी घेत शाळांच्या स्तरावर योग्य तो समन्वय साधावा, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

12:29 PM, 25 Jul 2024 (IST)

रायगड जिल्ह्यातील नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, राधानगरी धरण १०० टक्के भरलं!

रायगड जिल्हयातील कुंडलिका, अंबा, पाताळगंगा आणि सावित्री नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरण 100 टक्के भरलं. या धरणाचे स्वयंचलित सात दरवाजांपैकी सहा नंबर गेटचा स्वयंचलित दरवाजा खुला झाला.

12:20 PM, 25 Jul 2024 (IST)

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर- मुख्यमंत्री

मुंबई - "मुंबई, पुणे, रायगड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे फिल्डवर आहेत. पूरसदृश्य परिस्थिती असताना बचाव कार्य वेगानं सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडावं, असं आवाहन मी करतो. काळजी करू नये," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. "एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या, सैन्यदल , नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या सर्वांना एकमेकात समन्वय ठेवून आवश्यकतेप्रमाणे मदत करण्याचे मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. मुंबईत कोणत्याही आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सतर्क आहे. तसेच मी पुणे, रायगड, मुंबई जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांच्या संपर्कात आहे."

10:48 AM, 25 Jul 2024 (IST)

एनडीआरएफच्या पथकांना पुण्यात पाचारण, सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन

पुणे- पुण्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. नागरिकांच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या पथकांना बोटीसह पाचारण करण्यात आलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सहकार्य करण्याचे प्रशासनानं आवाहन केलं.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून मदतकार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्याचेही निर्देश दिले आहेत. एकता नगर भागातील मदत कार्याचाही अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला आहे. पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये आणि इतर आस्थापनांना सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले आहेत. पुणे महानगरपालिकेच्या ८ बोटी आणि बचाव पथक मदातकार्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत.

Last Updated : Jul 25, 2024, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.